स्पोर्ट्स

पॅरालिम्पिक : भारताने बॅडमिंटनमध्ये जिंकली 10 मिनिटांत 2 पदके!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी (दि. 2) भारताने 10 मिनिटांत 2 पदके जिंकली. एकीकडे तुलसीमती मुरुगेसनला बॅडमिंटनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या SU5 प्रकारातील अंतिम फेरीत तिला चीनच्या यांग क्विक्सिया हिच्याकडून 21-17, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे याच गटात मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरीनचा 21-12, 21-8 असा सहज पराभव लरून कांस्यपदकाची कमाई केली.

पहिल्या फेरीच्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत मुरुगेसनने एकही सेट गमावला नाही. आतापर्यंत तिने आपल्या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत अंतिम फेरी गाठली. मात्र विजेतेपदाच्या लढतीत तिला चीनच्या खेळाडूने 21-17, 21-10 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. दुसरीकडे, मनीषाने एकतर्फी सामना जिंकून भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

एका दिवसात बॅडमिंटनमध्ये 3 पदके

भारताच्या पदकांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. मुरुगेसन आणि मनीषा यांच्या आधी नितीश कुमारने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. आजच, म्हणजे 2 सप्टेंबर रोजी, नितीश कुमारने पुरुष एकेरी SL 3 गटाच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बॅटलीचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्ण कामगिरीची नोंद केली. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे एकूण दुसरे सुवर्णपदक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT