Twitter
स्पोर्ट्स

पॅरालिम्पिक : भारताच्या खात्यात 25 वे पदक! कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले कांस्यपदक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॅरा ज्युडोपटू कपिल परमारने चमकदार कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या 60 किलो J1 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने ब्राझीलच्या एलिटॉन डी ऑलिव्हेराचा 10-0 असा पराभव केला. पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो भारताचा पहिला ज्युडोपटू ठरला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या 25 वर पोहचली आहे. यात पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे. (Paris Paralympics Kapil Parmar Judo Bronze Medal)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT