सीएएसने विनेशला तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.  File Photo
स्पोर्ट्स

Vinesh Phogat vs CAS : सीएएसने ‘हे’ 3 प्रश्न विचारून विनेश फोगाटला टाकले गोंधळात!

विनेशच्या खटल्याच्या निकालाची तारीख पुढे ढकलली

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Vinesh Phogat Controversy : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणी अद्याप निर्णय झालेला नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. याप्रकरणी तिने सीएएसकडे दाद मागितली होती. परंतु सीएएसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सीएएसने विनेशला तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

सीएएस न्यायाधीशांनी विनेशला कोणते तीन प्रश्न विचारले?

  • दुसऱ्या दिवशीही वजन करावं लागेल हा नियम तुम्हाला माहीत होता का?

  • क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का?

  • या प्रकरणाचा निकाल सार्वजनिक घोषणेद्वारे करायचा की गोपनीय रीतीने तो खाजगीरित्या कळविला जावा?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने भारतासाठी चमकदार कामगिरी केली होती. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. या कारणामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. वजन कमी करण्यासाठी विनेशने शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र तिला यश मिळाले नाही. आता प्रकरण CAS मध्ये आहे. विनेशसोबतच चाहतेही CAS च्या निर्णयाची वाट पाहत आहेत. (Vinesh Phogat Controversy)

निकालाची तारीख पुढे ढकलली

विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्रीस्टाइल सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी निर्धारित वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने अपात्र घोषित करण्यात आले. या निर्णयानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला. विनेश फोगटने या निर्णयाबाबत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएसए) कडे अपील केले. यादरम्यान तिने किमान रौप्य पदक दिले जावे अशी मागणी केली आहे. वास्तविक, विनेशच्या खटल्याच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा निर्णय 11 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता येणार आहे.

भारताने जिंकले 6 पदके

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. यात 1 रौप्य आनि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक, तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. नेमबाजीत देशाला तीन कांस्य पदके मिळाली. कुस्तीतूनही एका पदकाची भर पडली. (Vinesh Phogat Controversy)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT