पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आहे. त्याने 89.45 मीटर थ्रोसह रौप्य पदकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करून सुवर्ण पदक पटकावले. त्याच्या या कामगिरीचा पदक तालिकेवर मोठा परिणाम झाला आहे. केवळ एक पदक असले तरी ते सुवर्ण असल्याने पाकिस्तानने पदक तालिकेत मुसंडी मारत पाच पदके पटकविणार्या भारताला पिछाडीवर टाकले आहे. (Olympics 2024 Medal Tally )
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने सुवर्णपदक पटकावल्याने र पाकिस्तान ऑलिम्पिक पदकतालिकेत 53 व्या स्थानावर पोहोचला आहे तर भारत 64 व्या स्थानावर आहे. सध्या पदक तालिकेत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. या देशाने आतापर्यंत एकूण 30 सुवर्ण, 38 रौप्य आणि 35 कांस्यपदक जिंकले आहेत. चीन 29 सुवर्ण, 25 रौप्य आणि 19 कांस्य म्हणजे एकूण 73 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर एकूण ४५ पदकांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.