Paris Olympics 2024 Day 1
पॅरिस ऑलिम्पिकम- १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिकमध्ये रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांनी ६२८.७ गुणांसह सहावे स्थान मिळवले.  (Image Source- Sports Authority of India)
स्पोर्ट्स

Paris Olympics 2024 Day 1 | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांची संधी थोडक्यात हुकली

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024 Day 1) च्या सीना नदीच्या किनाऱ्यावरील शुक्र्वारच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आज शनिवारी ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली. पण पॅरिस २०२४ ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नेमबाजीत भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला धक्का बसला. कारण १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत (10m Air Rifle Mixed Team event) दोन्ही भारतीय जोड्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाहीत. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिकमध्ये भारतीय संघातील रमिता जिंदाल (Ramita Jindal) आणि अर्जुन बाबुता (Arjun Babuta) यांनी ६२८.७ गुणांसह सहावे स्थान मिळवले. तर इलावेनिल वालारिवन (Elavenil Valarivan) आणि संदीप सिंह (Sandeep Singh ६२६.३ गुणांसह १२ व्या स्थानावर राहिले. दोन्ही जोड्या टॉप ४ स्थानाच्या बाहेर गेल्या. जे पदक फेरीत जाण्यासाठी आवश्यक होते.

रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता जोडी पात्रतेच्या सर्वात जवळ पोहोचले होते. पण अखेर ६२८.७ गुणांसह त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांचे टॉप ४ स्थान थोडक्यात हुकले. त्यांचा नॉर्वे आणि जर्मनीपेक्षा केवळ एक गुण कमी पडला. या दोन देशांच्या जोडीने ६२९.७ गुण मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला.

तिरंदाजीत पदकाच्या आशा

दरम्यान, उद्घाटन समारंभाच्या आधी गुरुवारी (दि. २५) भारताच्या मोहिमेची तिरंदाजीने सुरुवात झाली होती. भारतीय तिरंदाजी महिला संघाने पात्रता क्रमवारीत कोरिया, चीन आणि मेक्सिको यांच्यानंतर चौथे स्थान पटकावले. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. भारतीय पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. यामुळे तिरंदाजीत पदकाच्या आशा आहेत.

Paris 2024 Olympics rowing : रोइंगमध्ये बलराज पनवार चौथ्या स्थानी

रोइंगच्या (Rowing) पुरुष एकल स्कल्स हीट्समध्ये (Men’s Single Sculls Heats) बलराज पनवार (Balraj Panwar) याने चौथे स्थान मिळवले. त्याला उद्या दुपारी १ वाजता होणाऱ्या रेपेचेज फेरीत पुढे गेला आहे.

आज ऑलिम्पिकमध्ये भारत

भारताचा टेबल-टेनिस स्टार हरमीत देसाई पुरुष एकेरीच्या प्राथमिक फेरीत खेळेल. तर लक्ष्य सेन आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोडी अनुक्रमे पुरुष एकेरी आणि दुहेरी गटात गट टप्प्यातील सामन्यांमध्ये खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना आज रात्री ९ वाजता न्यूझीलंडशी होईल. बॉक्सर प्रीती पवार महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या ३२ इव्हेंटच्या प्राथमिक फेरीत खेळेल. रविवारी (२८ जुलै) सकाळी १२:०२ वाजता हा सामना होईल.

SCROLL FOR NEXT