उपांत्‍यपूर्व फेरीत मिळवलेल्‍या रोमहर्षक विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडूंचा जल्‍लोष सुरु झाला.यावेळी श्रीजेश आपल्या हॉकी स्टिककडे बोट दाखवताना दिसला.  X (Twitter)
स्पोर्ट्स

टीम इंडियाची 'भिंत' ठरलेल्‍या श्रीजेशच्‍या हॉकी स्‍टिकवर कोणाचे नाव?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Paris Olympics 2024 Hockey : टोकियोनंतर पॅरिसमध्येही भारताने उपांत्‍यपूर्व फेरीच्‍या सामन्‍यात ग्रेट ब्रिटनला पराभवाची धूळ चारून ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार गोलकीपर श्रीजेश ठरला. त्याने भक्कम बचाव करून ग्रेट ब्रिटनच्या एकामागून एक होणा-या हल्ल्यांना परतवून लावले. आपली शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना तो पोस्टवर भक्कमपणे उभा राहिला. शूटआऊटमध्ये भारताने 4-2 असा विजय मिळवला. या विजयाचा पीआर श्रीजेश शिल्‍पकार ठरला.

विजयानंतर श्रीजेशच्‍या हॉकी स्‍टिककडे वेधले सर्वांचे लक्ष

उपांत्‍यपूर्व फेरीत मिळवलेल्‍या रोमहर्षक विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडूंचा जल्‍लोष सुरु झाला.यावेळी श्रीजेश आपल्या हॉकी स्टिककडे बोट दाखवताना दिसला. या स्‍टीकवर त्याने आपल्या पत्नीचे नाव अनेश्या लिहिले आहे. आजचा विजय त्‍याने संपूर्ण देशासह आपली पत्‍नी अनेश्‍या हिला समर्पित केला.

तिसरा क्वार्टरमध्ये श्रीजेशचा दबदबा

बरोबरीचा गोल केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या ब्रिटीशांनी तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच आक्रमण केले. पण श्रीजेशने गोल वाचवण्यात यशस्वी झाला पण तो यादरम्यान जखमी झाला. 34व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि श्रीजेशने दोन्ही वेळा धोका टाळला. 40व्या मिनिटाला श्रीजेशने पुन्हा पेनल्टी कॉर्नर वाचवून ग्रेट ब्रिटनला आघाडी घेण्यापासून रोखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना यश मिळाले नाही. क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी भारताच्या सुमितला ग्रीन कार्ड मिळाले.

शूटआऊटमध्ये टीम इंडियाचा विजय

ग्रेट ब्रिटनने शूटआउटला सुरुवात केली आणि जेम्स हेन्रीने पहिल्या संधीवर गोल केला. कर्णधार हरमनप्रीतनेही मिळालेल्या संधीचे सोने करत गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी जॅक वॉलेसने पुन्हा गोल केला. सुखजित सिंगने टीम इंडियाला पुन्हा बरोबरी मिळवून दिली. तिसऱ्या शॉटमध्ये कोनोर विल्यमसनने चेंडू बाहेर मारला. ललित उपाध्यायने गोल करत भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. ब्रिटनचा पुढचा प्रयत्न श्रीजेशने उधळून लावला आणि गोल वाचवला. त्यानंतर राजपालने गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

श्रीजेश भिंतीसारखा उभा राहिला

स्कोअरलाइन 1-1 अशी बरोबरी राहिली ती श्रीजेशमुळेच. कारण त्याने ब्रिटनचे अनेक हल्ले हाणून पाडले. यात भारताच्या बचावफळीचाही वाटा राहिला, पण असे काही प्रसंग आले जेव्हा ब्रिटनने भारतीय बचावपटूंना ओलांडले पण त्यांच्या आक्रमणासमोर श्रीजेश भिंतीसारखा उभा राहिला. हे आकडेवारीवरून चांगले समजू शकते. ब्रिटनने भारताच्या गोलवर एकूण 21 शॉट्स मारले, पण त्यांना एकदाच यश आले.

 शूटआऊटचा थरार

  • ब्रिटनने पहिला शूटआउट घेतला आणि अल्बरी ​​जेम्सीने गोल केला.

  • भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानेही गोल केला.

  • ब्रिटनसाठी वॉलेस दुसरा शॉट घेण्यासाठी आला आणि त्याने गोल केला.

  • भारतासाठी सुखजीत आला आणि त्याने गोल करत स्कोअर 2-2 अशी बरोबरीत आणला.

  • ब्रिटनाचा तिसरा प्रयत्न क्रोनन चुकवला.

  • ललितने भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल केला आणि भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.

  • चौथ्या प्रयत्नातही इंग्लंडला गोल करता आला नाही. श्रीजेशने यशस्वी बचाव केला.

  • भारतासाठी चौथ्या प्रयत्नात राजकुमारने गोल केला.

  • अशाप्रकारे भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT