Paris Olympic 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दिमाखदार सुरुवात केली. पुरुष एकेरीच्‍या पहिल्‍या सामन्‍यात त्‍याने ग्वाटेमालाच्‍या केविन कॉर्डन यांचा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. File Photo
स्पोर्ट्स

Paris Olympic 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्‍य सेनची दिमाखदार सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दिमाखदार सुरुवात केली. पुरुष एकेरीच्‍या पहिल्‍या सामन्‍यात त्‍याने ग्वाटेमालाच्‍या केविन कॉर्डन यांचा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

पहिल्‍या गेममध्‍ये निर्विवाद वर्चस्‍व, दुसर्‍या गेममध्‍ये दमदार कमबॅक

सामन्‍याच्‍या पहिल्‍या गेममध्‍ये लक्ष्‍य सेनने निर्विवादीत वर्चस्‍व ठेवले. त्‍याने पहिला गेम २१-८ असा आपल्‍या नावावर केला. दुसर्‍या गेममध्‍ये कॉर्डनने आपल्‍या नावाला साजेसा खेळ करत दमदार कमबॅक करत आघाडी घेतली. मात्र युवा लक्ष्‍य सेन याने मात्र सलग पाच गुण घेत २२-२० असा दुसरा गेमही जिंकत पहिल्या फेरीतील रोमांचक लढत जिंकली!

SCROLL FOR NEXT