Paralympics : Rubina Francis
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्‍या रुबिना फ्रान्सिसने चमकदार कामगिरी करत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले.  (Image source- X)
स्पोर्ट्स

रुबिना फ्रान्सिसने पॅरालिम्पिक गाजवलं, कांस्य पदकाला गवसणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्‍या रुबिना फ्रान्सिसने चमकदार कामगिरी करत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले. पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक ठरले आहे.

नेमबाजीतील भारताला मिळवून दिले चौथे पदक

रुबिनाने 10 मीटर एअर पिस्तूल SH1 पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावले होते, मात्र अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. रुबिनाने पात्रता फेरीत ५५६ गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत 211.1 गुणांनी . रुबिना एके काळी दुसऱ्या स्थानावर धावत होती, पण सहाव्या मालिकेत ती मागे पडली; पण अखेर पहिल्या तीनमध्ये राहण्यात यशस्वी झाली. पॅरिस पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे. रुबिनापूर्वी अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक , तर मोनाने कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली होती. मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दृढनिश्चयाने यशाला गवसणी

रुबिना फ्रान्सिस मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रुबिनाला अनेक अडथळ्याचा सामना करावा लागला. रुबिनाचे वडील मेकॅनिक आहेत. आर्थिक अडचणींचा तिला सामना करावा लागला. २०१५ मध्ये गगन नारंगच्या ऑलिम्पिक कामगिरीची प्रेरित घेत रुबिनाचा नेमबाजीतील प्रवास सुरू झाला. आर्थिक अडथळे असूनही, तिच्या जिद्दीने वडिलांच्या अथक प्रयत्नांनी 2017 मध्ये पुण्याच्या गन फॉर ग्लोरी अकादमीमध्‍ये ती दाखल झाली. येथे जय प्रकाश नौटियाल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव सुरु केला. तिची मध्‍य प्रदेश शुटींग अकादमीमध्ये निवड झाली. येथे तिला प्रख्यात प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या मार्गदर्शन लाभले. तिने पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवले.

अनेक अडथळ्यांना तोंड देत यशाला गवसणी

2018 च्या फ्रान्स नेमबाजी विश्वचषक स्‍पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली. 2019 मध्‍ये मुख्य प्रशिक्षक श्री. सुभाष राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. त्‍याचबरोबर जागतिक विक्रमही प्रस्थापित केले. लिमा 2021 विश्वचषक स्पर्धेत तिची मुगुट कामगिरी झाली, जिथे तिने P2 प्रकारात पॅरालिम्पिक कोटा मिळवला, 2021 टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आज ती देशातील भारतातील तरुण मुलींसाठी एक प्रेरणा बनली आहे, आपल्‍या स्वप्नांचा पाठपुरावा करताना तिला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. मात्र दृढनिश्चय, परिश्रमातील सातत्‍य आणि समर्पणाच्‍या जोरावर आज तिने आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशासाठी अभिमानास्‍पद कामगिरी केली आहे. सामर्थ्याचा पुरावा आहे.

SCROLL FOR NEXT