पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला. हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडिअम येथे खेळवला जात आहे. यामध्ये रिजवान आणि शकिल यांच्या झंझावती शतकांच्या जोरावर पाकिस्तानने भलीमोठी धाव संख्या उभा केली आहे. पाकिस्तान संघाने 6 विकेट गमावून 448 धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना शोरिफुल इस्लाम आणि हसन महमुद यांनी प्रत्येकी दोन तर शाकिब आणि मिराजने एक-एक बळी टिपला. शाहीन आफ्रिदी नाबाद २९ आणि मोहम्मद रिझवान १७१ धावा करून नाबाद राहिले. बांगलादेश संघाचा पहिला डाव सुरू झाला आहे. (PAK vs BAN 1st Test)
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या खराब सुरुवातीनंतर संघाने दमदार पुनरागमन केले आणि 4 गडी गमावून 158 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा युवा स्टार फलंदाज शकिल शतकी खेळी केल्यानंतर बाद झाला. त्याच्यामध्ये आणि रिजवान यांच्यामध्ये 240 धावांची बलाढ्य भागीदारी झाली. या 449 धावांचा पाठलाग करण्यासाठी बांग्लादेशाचे सलामीवीर शादमान इस्लाम आणि झाकीर हसन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. दोघांमध्ये 11 षटकांनंतर 22 धावांची भागीदारी झाली. दोन्ही फलंदाज सावधपणे खेळत आहेत. बांगलादेश अजूनही 426 धावांनी मागे आहे. बांगलादेशने एकही विकेट न गमावता २७ धावा केल्या आहेत. शादमान इस्लाम 12 धावा करून नाबाद तर झाकीर हसन 11 धावा करून परतला.
पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ गडगडल्यावर, रिजवान आणि शकिल यांनी संघांची कमान आपल्या हाती घेतली. तसेच डाव सांभाळत दोघांनीही दमदार शतके ठोकली आहेत. यासोबतच या सामन्यात दोघांनीही आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक ठाकले आहे. दोघांमध्ये 240 धावांची बलाढ्य भागीदारी झाली. या सामन्यात शकिलने 261 चेंडूमध्ये 141केल्या तर रिजवानने 239 चेंडूमध्ये 171 धांवाची दमदार दीडशतकी खेळी केली.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तान वरचढ ठरलेले आहे. पाकिस्तान संघाने 13 सामन्यांपैकी 12 सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचवेळी बांगलादेश संघ आपल्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानावर 5 सामने आणि विदेशी ग्राउंडवर 7 सामने जिंकले आहेत.
पाकिस्तान प्लेइंग-11
अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग-11
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (प.), शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.