Paris 2024 Olympics
पॅरिस ऑलिम्पिकचे शानदार उद्घाटन  File Photo
ऑलिंपिक

पॅरिस ऑलिम्पिकचे शानदार उद्घाटन

सोनाली जाधव

पॅरिस : संस्कृती आणि आधुनिकता यांचा मनोहारी मिलाफ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाला. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा स्टेडियममध्ये नव्हे तर, चक्क सीना नदीच्या किनाऱ्यावर रंगला.

भारतीय पथकाकडून दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने महिला ध्वजवाहक म्हणून, तर अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने पुरुष ध्वजवाहक या नात्याने कामगिरी पार पाडली. सर्व खेळाडूंनी बोटीतून परेड केली आणि त्याची लांबी सुमारे सहा कि.मी. होती. ही परेड ऑस्टरलिटझ ब्रीजपासून सुरू होऊन आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचली. सुमारे ९४ बोटी या परेडचा भाग होत्या

उद्घाटनाचा रंगारंग सोहळा

  • सोहळा एकूण तीन तास ४५ मिनिटांचा

  • शंभर देशांच्या प्रमुखांची उपस्थिती

  • ९४ बोटींवर, त्यात सात हजार खेळाडू; तसेच २०६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

  • सीना नदीच्या दोन्ही बाजूंच्या किनाऱ्यावर; तसेच पुलांवर एकूण तीन हजार कलाकारांचा

    आविष्कार

  • फ्रान्स आणि पर्शियन संस्कृती दाखवणारे बारा चित्ररथ

  • एक अब्ज क्रीडारसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिला

SCROLL FOR NEXT