पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर 3 पोझिशन्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा आणि भारताचा पहिला पदक विजेता स्वप्नील कुसाळे आज (दि. ७) भारतात दाखल झाला. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Swapnil Kusale)
कांबळवाडी (जि. कोल्हापूर) येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकून दिले आहे. त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. तर मध्य रेल्वेने त्याला तिकीट चेकर पदावरून बढती दिली असून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) स्पोर्ट्स सेल म्हणून पदोन्नती दिली आहे. (Paris Olympics Swapnil Kusale)