टेनिसपटू नोव्हाक जोकोविच. 
स्पोर्ट्स

Novak Djokovic |'अद्वितीय' जोकोविच! ग्रँड स्लॅममध्ये 'विराट' कामगिरी; ४०० व्या विजयासह रचला नवा इतिहास!

ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या उप-उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात केला प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत खेळणारा तो सर्वाधिक वयाचा खेळाडू असूनही त्याचे मैदानावरील वर्चस्व अबाधित आहे.

Novak Djokovic rewrote tennis history at the Australian Open 2026

मेलबर्न : टेनिसचा बादशाह, अशी ओळख निर्माण करणार्‍या नोव्हाक जोकोविचने टेनिसच्या इतिहासात नव्या सुवर्णअध्यायाची नोंद केली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये ४०० सामने जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आज (दि. २४ जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्‍पर्धेतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात त्‍याने नेदरलँड्सच्या बोटिक वॅन डी झँडशल्पचा ६-३, ६-४, ७-६ (४) असा पराभव करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

जोकोविचने मोक्‍याच्‍या क्षणी कायम ठेवला संयम

सुमारे २ तास ४४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने आपल्या अनुभवाच्या जोरावर वर्चस्व राखले. पहिल्या दोन सेटमध्ये त्याने आपल्या अचूक सर्व्हिस आणि भक्कम खेळाने वॅन डी झँडशल्पला दडपणाखाली ठेवले. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये वॅनने त्‍याला कडवी झुंज दिली आणि सेट टाय-ब्रेकरपर्यंत ओढला. मोक्याच्या क्षणी जोकोविचने आपला संयम ढळू दिला नाही. तसेच प्रतिस्पर्धी वॅनला त्‍याच्‍या चुका महागात पडल्‍या आणि जोकोविचच्‍या नावावर ऐतिहासिक विजय नोंदला गेला.

उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

विजयासह जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत (Round of 16) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत खेळणारा तो सर्वाधिक वयाचा खेळाडू असूनही त्याचे मैदानावरील वर्चस्व अबाधित आहे. आता पुढच्या फेरीत त्याचा सामना सोळावा मानांकित जेकब मेन्सिक किंवा अमेरिकेचा इथन क्विन यांच्यातील विजेत्याशी होईल.

ग्रँड स्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू

  1. नोव्हाक जोकोविच (सर्बिया): ४०० विजय

  2. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड): ३६९ विजय

  3. राफेल नदाल (स्पेन): ३१४ विजय

  4. जिमी कॉनर्स (अमेरिका): २३३ विजय

  5. आंद्रे आगासी (अमेरिका): २२४ विजय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT