खेळाडूला बाद केल्यानंतर ‘नोटबुक’ सेलिब्रेशन करताना दिग्वेश राठी. Pudhari Photo
स्पोर्ट्स

‘नोटबुक’ सेलिब्रेशन पडले महागात! 'LSG' च्या खेळाडूला 'BCCI' चा दणका

IPL 2025 | पंजाब किंग्जसोबतच्या सामन्यानंतर खेळाडूची मॅच फी कापली

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोटबुक... ती जवळ ठेवणे आणि त्यात गोष्टी लिहून ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. पण, आपण ज्या नोटबुकबद्दल बोलत आहोत त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूचे नुकसान झाले आहे. लखनऊचा खेळाडू नोटबुक सेलिब्रेशन करताना दिसला. १ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एलएसजीच्या दिग्वेश राठीनेही असाच आनंद साजरा केला. पण सामन्यानंतर हे स्पष्ट झाले की, ही मजा त्याच्यासाठी शिक्षेत बदलली आहे. असे करून त्याने आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL 2025| सामना शुल्क केला कपात

दिग्वेश राठीला त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजे एवढे पैसे त्याच्या खिशातून कापले जातील. या दंडाव्यतिरिक्त, एलएसजी खेळाडूच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. सामनाधिकारी यांनी दिग्वेश राठी यांना लेव्हल १ चा दोषी ठरवले आहे. जर एखादा खेळाडू लेव्हल १ चा दोषी आढळला तर त्या बाबतीत सामनाधिकारींचा निर्णय वैध आणि अंतिम असतो.

पंजाबच्या चाहत्यांनी लखनौला दिले चोख प्रत्युत्तर

IPL 2025 मधील 13 व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जाएंट्सचा 8 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात लखनऊचा गोलंदाज दिग्वेश राठीने पंजाब किंग्जचा ओपनर प्रियांश आर्यला बाद करताच 'नोटबुक सेलिब्रेशन' केलं. यानंतर पंजाब सामन्या जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना स्टेडियममधील पंजाबच्या चाहत्यांनी दिग्वेशकडे पाहुन नोटबुक सेलिब्रेशनचे चोख प्रत्युत्तर दिले.

IPL 2025 | पंजाब किंग्जकडून दिग्वेशने दोन्ही विकेट घेतल्या

त्यानंतर दिग्वेश राठीने सामन्यात आणखी एक विकेट घेतली, ती प्रभसिमरन सिंगची, आणि त्याने श्रेयस अय्यरसोबतची ८४ धावांची भागीदारी मोडली. एलएसजीने सामन्यात पंजाब किंग्जच्या फक्त या दोन विकेट घेतल्या आणि त्या दोन्ही दिग्वेश राठीने घेतल्या. त्याने ४ षटकांत ३० धावा देत २ बळी घेतले. लखनौने पंजाबसमोर जिंकण्यासाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग त्यांनी २२ चेंडू आधी केला आणि सामना ८ विकेट्सने जिंकला.

'नोटबुक सेलिब्रेशन'साठी दिग्वेश राठींला मोठी किंमत मोजावी लागली

ज्या चुकीमुळे दिग्वेश राठीला दंड ठोठावावा लागला आणि १ डिमेरिट पॉइंट गमवावा लागला ती चूक सामन्यादरम्यान कधी घडली? तर पंजाब किंग्जच्या डावातील तिसऱ्या षटकात हे दिसून आले, जेव्हा दिग्वेश राठीने सलामीवीर प्रशांत आर्यला बाद केले. दिग्वेश राठीच्या त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने प्रशांत आर्यचा सहज झेल घेतला. विकेट मिळताच, दिग्वेश राठीने नोटबुक सेलिब्रेशन केले आणि प्रशांत आर्यला डगआउटकडे जाण्याचा इशारा केला. आणि ही चूक महागात पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT