स्पोर्ट्स

नितीश राणा, ध्रुव शौरी दिल्ली सोडणार?

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्ली रणजी संघाचा माजी कर्णधार ध्रुव शौरी आणि नितीश राणा यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) कडे संघ बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागितली आहे. आगामी मोसमात हे खेळाडू दिल्लीकडून खेळू इच्छित नाही. त्यांनी डीडीसीएकडे औपचारिकपणे याची मागणी केली आहे, तरीही असोसिएशनने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

दिल्लीकडून खेळताना नितीश राणा आणि ध्रुव शौरी यांची कारकीर्द ज्या दिशेने जात होती, त्या दिशेने दोन्ही क्रिकेटपटू नाराज होते. या संघासोबत पुढे जाण्याचा त्यांचा इरादा नसल्याचे त्यांनी औपचारिकपणे स्पष्ट केला होता. गेल्या देशांतर्गत हंगामाच्या समाप्तीपासून तो इतर पर्यायांच्या शोधात होते. नितीश राणाने जानेवारीत झालेल्या रणजी स्पर्धेत मुंबईविरुद्ध 11 आणि 6 धावा केल्या होत्या. शेड्यूलमधील शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध होता, मात्र नितीशने त्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव मागे घेतले.

एका सूत्राने न्यूज 18 ला सांगितले की, नितीश राणा गेल्या हंगामापासून बदलीच्या शोधात होता. गेल्या मोसमात राणाला ज्या पद्धतीने कर्णधारपदावरून वगळण्यात आले त्यामुळे तो नाराज झाला होता.

ध्रुव मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे, पण लाल चेंडूंच्या फॉरमॅटमध्ये तो महत्त्वाचा खेळाडू बनला आहे, त्यामुळे त्याच्या पांढर्‍या चेंडूचे क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी होत आहे. तो दिल्लीसाठी रेड बॉल क्रिकेट खेळतो, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला न मिळणार्‍या संधींमुळे तो खूश नव्हता.'

डीडीसीएने नुकतीच बुची बाबू स्पर्धेसाठी संघ निवडला आणि नितीश राणा व ध्रुव शौरी यांचे नाव त्यात आहे. मात्र, संघ स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या एक दिवस आधी दोघांनी एनओसीची मागणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT