निकोलस पूरनचे २०२४ मध्ये दीडशे षटकार Nicholas Pooran
स्पोर्ट्स

T20 Cricket : निकोलस पूरनचे २०२४ मध्ये दीडशे षटकार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : निकोलस पूरन याने काही दिवसांपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड सेट केला होता. आता त्याने २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये १५० षटकार मारण्याचा टप्पा गाठला आहे.

हे वर्ष संपायला आणखी तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे त्याचा हा आकडा दोनशेपार सहज होईल, असे वाटते. सध्या तो ज्या आकड्यापर्यंत पोहोचलाय तो आकडा गाठणेही साधी सोपी गोष्ट नाही.

निकोलस पूरन आधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे होता. वेस्ट इंडीजच्या या क्रिकेटरने २०१५ या कॅलेंडर इयरमध्ये १३५ षटकार मारले होते. गेलचा हा रेकॉर्ड तब्बल ९ वर्षे अबाधित होता. जो निकोलस पूरनने मोडीत काढला.

कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) २०२४ च्या हंगामात २२ सप्टेंबरला रंगलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट किटस् अँड नेविस पॅट्रियॉटस् यांच्यातील सामन्यात पूरन याच्या भात्यातून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.

नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या पूरन याने ४३ चेंडूंत ९३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ षटकारांचा समावेश होता. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात १५० षटकार मारण्याचा मैलाचा पल्ला गाठला. याआधी अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT