नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचे एकच स्वप्न म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे. सध्या ही 'सुपर मॉम' कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. आपल्या भविष्यातील योजनेविषयी बोलताना 37 वर्षीय मेरी कोमने सांगितले की, 'जोपयर्र्त माझे स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी हार मानणार नाही.'
2012 मधील लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने स्पोर्टस् अॅथोरिटी ऑफ इंडिया (साई) साठी लाईव्ह फेसबुकवर बोलताना वरील मत व्यक्त केले. कोरोना व्हायरसचा जगात वाढत असलेल्या प्रकोपामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी जुलै महिन्यात होणार आहे. मेरी कोमची ही कारकिर्दीतील शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. मेरी कोमने सांगितले की, 'सध्या माझे लक्ष पूर्णपणे ऑलिम्पिक स्पर्धेवर आहे. या स्पर्धेत देशासाठी मला सुवर्णपदक जिंकावयाचे आहे. यासाठी मी वयाच्या 37 व्या वर्षीही कठोर परिश्रम करीत आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणे, हे एक अत्यंत अवघड आव्हान होते.