रोहितने आपले गुरु, मार्गदर्शक, मित्र राहुल द्रविड यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे.  Twitter
स्पोर्ट्स

Rohit Sharma Post: ‘राहुल द्रविड माझी वर्क वाईफ...’! हिटमॅनची इन्स्टा पोस्ट व्हायरल

‘प्रिय राहुल भाई...’, रोहितची द्रविड यांच्यासाठी भावनिक फटकेबाजी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Post : रोहित शर्माने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्याशिवाय राहुल द्रविड यांचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन युग सुरू होणार आहे. नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल, तर हिटमॅन वनडे आणि कसोटी क्रिकेट कॅप्टन्सीवर फोकस करेल. दरम्यान, कर्णधार रोहितने आपले गुरु, मार्गदर्शक, मित्र आणि एक अद्भुत व्यक्ती राहुल द्रविड यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे. सोशल मीडियावरील ही भावनिक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.

‘मी भाग्यवान...’

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना रोहितने लिहिलंय की, ‘प्रिय राहुल भाई, मी यावर माझ्या भावना योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मला खात्री नाही की मी ते कधी करू शकेन. अजूनही प्रयत्न करतोय. लहानपणापासून मी इतर कोट्यवधी चाहत्यांप्रमाणे मीही तुम्हाला पाहत आलो आहे. पण मी भाग्यवान आहे की मला तुझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहात. पण जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून त्या ड्रेसिंग रुममध्ये आलात, तेव्हा तुम्ही तुमची सर्व कामगिरी मागे टाकली होती. तुम्ही आमच्यासाठी खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि हे मला नेहमी स्मरणात राहील. माझी बायको तुम्हाला माझी वर्क वाईफ म्हणून संबोधायची. मी नशीबवान आहे की मला तुम्हाला हे सांगण्याची संधी मिळाली. आपण टी20 वर्ल्डकप जिंकला. आपण ही एकत्रितपणे हे साध्य केले याचा मला आनंद आहे. मी भाग्यवान आहे की तुम्हाला माझा विश्वासू, माझा मित्र आणि माझा प्रशिक्षक म्हणण्याची संधी मिळाली.’

रोहित शर्मामुळे राहुल थांबले...

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले होते की, ‘2023 विश्वचषकानंतर त्याचा करार संपला होता. पण रोहितच्या फोननंतरच मी करार वाढवण्याचा निर्णय घेतला. तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कॉल होता.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT