स्पोर्ट्स

RCB vs MI : कडू ‘स्मृती’ घेऊन आरसीबीचे पॅकअप

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB vs MI) संघाची सुरुवात कडू झाली आणि शेवटही कडू झाला. आरसीबीला महिला प्रीमियर लीगमधील विजयासह त्यांची मोहीम संपवता आली नाही. त्यांनी पराभवासह स्पर्धेचा निरोप घेतला. त्यांना त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध चार गडी राखून पराभव पत्करावा लागला.

मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने आरसीबीला 20 षटकांत नऊ गडी गमावून 125 धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये मुंबईला काही अंतराने सतत धक्के बसले, पण 16.3 षटकांत 6 बाद 129 अशी मजल मारली.

सलामीवीर हिली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. पण संघाला काही अंतराने सतत धक्के बसत राहिले. त्यामुळे सामना फिरेल असे वाटत होते, पण अमेलिया केर आणि पूजा वस्त्राकर यांनी तसे होऊ दिले नाही. पूजा 18 चेंडूत 19 धावा करून बाद झाली, मात्र तोपर्यंत तिने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. अमेलिया केरने 27 चेंडूत नाबाद 31 धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. सोफी डिव्हाईन पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया कारने आरसीबीला तीन धक्के दिले. त्याने प्रथम कर्णधार स्मृती मानधनाला झेलबाद केले. मानधना 24 धावा करू शकली. यानंतर हीदर नाइटला झेलबाद केले. तिला 12 धावा करता आल्या.

कनिका आहुजाला अमेलियाने यष्टिरक्षक यस्तिकाच्या हातून त्रिफळाचीत केले. एलिस पेरीला नॅट सीव्हर ब्रंट एलबीडब्ल्यू केले, त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. इस्सी वाँगने 20 व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कासट यांना बाद केले. रिचा 13 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 धावा करून बाद झाली. आरसीबीचा डाव 9 बाद 125 धावांवर थांबला.

संक्षिप्त धावफलक (RCB vs MI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 20 षटकांत 9 बाद 125 धावा. (रिचा घोष 29, इलिसे पेरी 29. अ‍ॅमेलिया केर 3/22)

मुंबई इंडियन्स : 16.3 षटकांत 6 बाद 129 धावा. (अ‍ॅमेलिया केर 31, हिली मॅथ्यूज 24, यास्तिका भाटिया 31. कनिका आहूजा 2/5)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT