मुंबई इंडियन्सने जिंकले दिल्लीचे ‘तख्त’! 
स्पोर्ट्स

मुंबई इंडियन्सने जिंकले दिल्लीचे ‘तख्त’!

MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 12 धावांनी विजय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : तिलक वर्मा, रेकल्टन, सूर्यकु मार यादव, नमन धीर यांची फटकेबाजी आणि कर्ण शर्मा-सँटेनर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने येथील ‘आयपीएल’ साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्षमय खेळ साकारला. मात्र, ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांना निर्णायक क्षणी विजयाने हुलकावणी दिली.

विजयासाठी 206 धावांचे आव्हान असताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ क ोणत्याच वळणावर विजयाच्या मार्गावर असल्याचे दिसून आले नाही. करुण नायरने 40 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकारांसह 89 धावांची झंझावाती खेळी साकारली. मात्र, त्याला सहकार्‍यांकडून योग्य साथ मिळाली नाही. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क गोल्डन डकचा मानकरी ठरला, तर अभिषेक पोरेलने 25 चेंडूंत 33 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत के. एल. राहुल (15), अक्षर पटेल (9), स्टब्ज (1), आशुतोष शर्मा (17), विप्रज निगम (14) ठरावीक अंतराने बाद होत राहिले, त्याचा दिल्लीला मोठा फटका बसला. शेवटच्या टप्प्यात दिल्लीच्या फलंदाजांनी आक्रमणावर भर दिल्याने काही काळ रंगत निर्माण होईल, अशी चिन्हे होती. मात्र, तोवर कदाचित बराच उशीर झाला होता. नंतरच्या टप्प्यात पडझड सुरूच राहिली आणि अंतिमत: दिल्लीचा डाव 19 षटकांत 193 धावांवर आटोपला.

प्रारंभी, तिलक वर्मा (59), रियान रेकल्टन (41), सूर्यकुमार यादव (40), नमन धीर (नाबाद 38) यांच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 बाद 205 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीतर्फे विप्रज निगम व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 5 बाद 205. (तिलक वर्मा 33 चेंडूंत 59, रियान रेकल्टन 41, सूर्यकुमार यादव 28 चेंडूंत 40, नमन धीर 17 चेंडूंत नाबाद 38, निगम, कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी).

दिल्ली कॅपिटल्स : 19 षटकांत सर्वबाद 193. (करुण नायर 40 चेंडूंत 89, अभिषेक पोरेल 25 चेंडूंत 33. क र्ण शर्मा 3-36, सँटेनर 2-36).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT