मुंबई : पुढारी ऑनलाईन
आयपीएलच्या १४व्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी चांगली झाली नाही. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या पराभवात मुंबई इंडियन्सला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. मुंबई इंडियन्सची पुढील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघाने कसून सराव केला.
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई संघाला विजयी पथाच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबईने संघाने कसून सराव सुरू आहे. मुंबईला सहावा गोलंदाज म्हणून पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याची उणीव जाणवली. हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीमुळे पहील्या सामन्यात गोलंदाजी करण्यापासुन दुर राहीला.
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माने जर गोलंदाजी केली तर आश्चर्य वाटून नये. कारण रोहित शर्माने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. रोहित शर्मा गोलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बेंगळुरूविरुद्ध पहिल्या सामन्यात मुंबईने १५९ धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये मुंबईला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवली. हार्दिक पंड्याला फिजिओच्या निर्णयामुळे गोलंदाजी दिली जात नाही. त्यामुळे जर रोहित शर्माने गोलंदाजी केली तर आश्चर्य वाटायला नको.
रोहित शर्मा या आधी आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये १५ विकेट घेतल्या आहेत. त्याने ६ धावा देत सहा विकेट अशी त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर एक हॅटट्रिक देखील आहे. ही हॅटट्रिक रोहितने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतली होती. असे असले तरी रोहित केकेआर विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करण्याची शक्याता थोडी कमी आहे. कारण त्यांच्याकडे पोलार्ड हा सहावा गोलंदाजीचा पर्याय आहे. जर पोलार्ड चालला नाही तरच रोहित गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.