पुढारी ऑनलाईन डेस्क : आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (दि.२०) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या सुरुवातीलाच हा निर्णय त्यांच्यासाठी अनुकूल असा ठरला नाही. कारण आरसीबीने आक्रमक सुरुवात करत सर्वात जलद अर्धशतक झळकावले.
सलामीवीर विराट कोहली आणि फिल साल्ट यांनी अवघ्या तीन षटकांत ५० धावांची भागीदारी करत सामना आपल्या बाजून वळवला. तथापि, त्यानंतर फिल साल्ट धावबाद झाला. दरम्यान, डीसीकडून या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुकेश कुमारने पहिल्याच षटकात आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवत चाहत्यांची मने जिंकली. मुकेश कुमारने सातव्या षटकात गोलंदाजी करताना देवदत्त पडिकलला बाद केले. विशेष म्हणजे, हे षटक निर्धाव होते. त्यात विकेटही मिळाली. यासह मुकेश आयपीएल २०२५ मध्ये विकेट मेडन टाकणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
जोफ्रा आर्चर – विरुद्ध सीएसके
वैभव अरोरा – विरुद्ध एसआरएच
मुकेश कुमार – विरुद्ध आरसीबी