स्पोर्ट्स

धोनीच्या ‘या’ फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ

Pudhari News

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : महेंद्र सिंग धोनी सध्या सोशल मिडियावर ट्रोल होताना दिसत आहे. धोनीने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे हा फोटो धोनीला चांगलाच महागात पडत आहे. धोनी कुटुंबासोबत सुट्टीची मजा घेण्यासाठी हिमाचल प्रदेशला गेला आहे. दरम्यान त्याने एका काठीने बांधलेल्या घराजवळ राहुन फोटो घेतला आहे.

 

अधिक वाचा : दुसऱ्या लाटेप्रमाणे तिव्र नसेल कोरोनाची तिसरी लाट

यावर Plant Tree Save Forests असे लिहले आहे. झाडे लावा जंगल वाचवा संदेश देणाऱ्या धोनीने तोडलेल्या झाडाचाच आधार घेतल्यावरून तो ट्रोल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी धोनीची चांगलीच खरडपट्टी केली आहे. सर्वात पहिल्यांदा हा फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत पेजवरून सोडण्यात आला. धोनीने झाडे लावा जंगल वाचवा ज्या ठिकाणाहून संदेश दिला आहे ते घर पुर्ण लाकडापासून बनवले आहे. हा हिमाचल प्रदेशच्या मीना बागमधील आहे

अधिक वाचा : भारत-इंग्लंड महिला संघांत आज पहिला वन-डे सामना

सोशल मिडियावर सध्या धोनीचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत या फोटोवर सात लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. दरम्यान धोनीने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. ज्या घरात उभा आहेस ते घर झाडे तोडूनच बनवले आहे. धोनीजी ज्याचा संदेश देता त्याचीच कत्तल केली तुम्ही असा नेटकऱ्यांनी धोनीचा समाचार घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT