पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खेळाव्यतिरिक्त धोनी त्याच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखला जातो. आजही त्याचा स्वॅग आणि हेअरस्टाईल त्याच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडते. धोनी वेळोवेळी हेअरकट बदलत असतो. चेन्नईला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने पुन्हा एकदा नवीन हेअरस्टाइल अवलंबली आहे, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.(MS Dhoni)
धोनीने (MS Dhoni) जी नवीन स्टाईल अजमावली आहे, त्यात तो लांब केस वगळता नवीन स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. हा नवा लूक त्याला प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम यांनी दिला आहे. यावरून धोनी आयपीएलच्या पुढील हंगामासाठी सज्ज आहे. अशी चर्चा क्रिकेटविश्वामध्ये होत आहे. पुढील वर्षाच्या आयपीएलसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले सर्व खेळाडू अनकॅप्ड खेळाडू मानले जातील. यानंतर सीएसके धोनीला कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.