MS Dhoni IPL Retirement Pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni IPL Retirement: MS धोनीची IPL मधूनही निवृत्ती! CSK मध्ये नव्या भूमिकेत दिसणार, मेंटर म्हणून सांभाळणार जबाबदारी

MS Dhoni IPL Retirement: एमएस धोनीने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आली असून, तो आयपीएल 2027 मध्ये खेळताना दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Shelke

MS Dhoni IPL Retirement: आयपीएल 2027च्या लिलावापूर्वी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही.

मात्र, क्रिकेटशी त्याचे नाते कायम राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची संघाच्या नव्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आयपीएल 2027 साठी खेळाडूंची रिटेन्शन यादी जाहीर होण्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षे आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षणाने चाहत्यांचे मनोरंजन करणारा धोनी आता खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये दिसणार नाही.

मात्र, चेन्नई सुपर किंग्ससोबतचा त्याचा प्रवास संपणार नाही. नव्या भूमिकेत तो संघाला मार्गदर्शन करताना दिसू शकतो. कर्णधार म्हणून धोनीने चेन्नई सुपर किंग्सला अनेकदा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुण आता संघातील नव्या खेळाडूंना उपयोगी पडू शकतात.

धोनीच्या निवृत्तीच्या या वृत्तामुळे आयपीएलमधील एका मोठ्या पर्वाचा शेवट झाला आहे. मात्र, मेंटर म्हणून त्याची नवी इनिंग कशी असेल, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT