UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या ILT20 च्या तिसऱ्या हंगामासाठी, MI फ्रँचायझी टीम MI Emirates सह सर्व 6 संघांनी त्यांच्या संघाबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. Twitter
स्पोर्ट्स

T20 League : MI फ्रँचायझी संघाने घेतला मोठा निर्णय! 8 खेळाडूंना केले रिटेन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 League : आयपीएल 2025 चा सीझन पुढील वर्षी एप्रिलमध्ये खेळवला जाईल, परंतु रिटेनशन पॉलिसीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, MI च्या फ्रँचायझी टीमने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या ILT20 च्या तिसऱ्या हंगामासाठी, MI च्या फ्रँचायझी टीम MI Emirates सह सर्व 6 संघांनी त्यांच्या संघाबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. ILT20 चा तिसरा हंगाम पुढील वर्षी 11 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अंतिम सामना 9 फेब्रुवारी 2025 रोजी खेळवला जाईल. यावेळीही या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत.

ILT20 ने अधिकृत घोषणा करताना सांगितले की, स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात जेसन रॉय (शारजाह वॉरियर्स), फखर जमान (डेझर्ट वायपर्स), शाई होप (दुबई कॅपिटल्स), लॉकी फर्ग्युसन (डेझर्ट वायपर्स), रोस्टन चेस (अबू धाबी नाईट रायडर्स), मॅथ्यू वेड (शारजाह वॉरियर्स), इब्राहिम झद्रान (गल्फ जायंट्स) आणि रोमॅरियो शेफर्ड (एमआय एमिरेट्स) पहिल्यांदाच खेळताना दिसतील.

सीझन 3 मध्ये स्टार खेळाडू चमकले

ऑस्ट्रेलियन स्टार डेव्हिड वॉर्नर आणि श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका सीझन 3 मध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सुनील नरेन, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड आणि रोव्हमन पॉवेल हेही आपापल्या संघाला ताकद देताना दिसतील. या लीगमध्ये सिकंदर रझा, ख्रिस जॉर्डन, जेम्स विन्स, शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांच्यासह गेल्या मोसमातील आणखी काही प्रतिभावान खेळाडू देखील असतील. कुसल मेंडिस आणि टॉम कोहलर-कॅडमोर यांचा समावेश राखून ठेवलेल्या इतर प्रमुख खेळाडूंमध्ये आहे.

अबू धाबी नाइट रायडर्स

नवीन करार : अल्लाह मोहम्मद गझनफर, गुडाकेश मोती, हसन खान, रोस्टन चेस आणि टेरेन्स हिंड्स.

रिटेन खेळाडू : आदित्य शेट्टी, अली खान, अलिशान शराफू, आंद्रे रसेल, अँड्रिस घोस, चारिथ अस्लंका, डेव्हिड विली, जो क्लार्क, लॉरी इव्हान्स, मायकेल पेपर आणि सुनील नरेन.

डेझर्ट वाइपर

नवीन करार : डॅन लॉरेन्स, डेव्हिड पायने, फखर जमान, लॉकी फर्ग्युसन आणि मॅक्स होल्डन

रिटेन खेळाडू : ॲडम होस, ॲलेक्स हेल्स, अली नसीर, आझम खान, बास डी लीडे, ल्यूक वुड, मायकेल जोन्स, मुहम्मद अमीर, नॅथन सॉटर, शेरफेन रदरफोर्ड, तनिश सुरी, वानिंदू हसरंगा.

दुबई कॅपिटल्स

नवीन करार : ॲडम रॉसिंग्टन, ब्रँडन मॅकमुलेन, गरूका संकेथ, गुलबादिन नायब, जेफ्री वँडरसे, जो बर्न्स, जो वेदरली, नजीबुल्लाह झद्रान, ओबेद मॅककॉय, स्कॉट कुग्गेलीजन, शराफुद्दीन अश्रफ आणि शाई होप.

रिटेन खेळाडू : दासुन शनाका, डेव्हिड वॉर्नर, दुष्मंथा चमीरा, हैदर अली, राजा अकीफ, रोवमन पॉवेल, सॅम बिलिंग्ज, सिकंदर रझा, झहीर खान, जेक फ्रेझर मॅकगर्क आणि ऑलिव्हर स्टोन.

नवीन करार : ॲडम लिथ, डॉमिनिक ड्रेक्स, डॅनियल वॉरॉल, इब्राहिम झद्रान, मार्क अडायर, टॉम कुरन, टायमल मिल्स आणि वहीदुल्ला झाद्रान.

रिटेन खेळाडू : अयान अफझल खान, मुझाराबानी, ख्रिस जॉर्डन, दीपेंद्र सिंग एरी, गेर्हार्ड इरास्मस, जेमी ओव्हरटन, जेम्स विन्स, जेमी स्मिथ, जॉर्डन कॉक्स, मोहम्मद जोहेब झुबेर, रेहान अहमद, रिचर्ड ग्लेसन आणि शिमरॉन हेटमायर.

एमआय एमिरेट्स

नवीन करार : अल्झारी जोसेफ, रोमारियो शेफर्ड, टॉम बँटन, फरीद मलिक, थॉमस जॅक ड्रेका, बेन चार्ल्सवर्थ.

रिटेन खेळाडू : अकील होसेन, आंद्रे फ्लेचर, डॅनियल मौसासी, ड्वेन ब्राव्हो, फझलहक फारुकी, जॉर्डन थॉम्पसन, किरॉन पोलार्ड, कुसल परेरा, मोहम्मद रोहिद खान, मोहम्मद वसीम, निकोलस पूरन, नोस्टुश केनजिगे, विजयकांत व्यासकांत आणि वकार सलामखिल.

शारजाह वॉरियर्स

नवीन करार : ॲडम मिलने, आदिल रशीद (सीझन 2 मध्ये वॉरियर्ससाठी वाइल्डकार्ड निवड म्हणून खेळला), ॲश्टन आगर, बानुका राजपक्षे, गुस ऍटकिन्सन, जेसन रॉय, करीम जनात, कीमो पॉल, जेसन रॉय, मॅथ्यू वेड आणि टिम सेफर्ट.

रिटेन खेळाडू : दिलशान मदुशंका, जॉन्सन चार्ल्स, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद जवादुल्ला, कुसल मेंडिस, ल्यूक वेल्स, पीटर हॅटझोग्लू आणि टॉम कोहलर-कॅडमोर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT