स्पोर्ट्स

Messi in india : स्टार फुटबॉलपटू मेस्‍सीच्‍या कोलकाता भेटीला गालबोट, संतप्‍त प्रेक्षकांनी मैदानावर फेकल्‍या बाटल्‍या!

मेस्‍सीची स्‍टेडियवर केवळ दहा मिनिट उपस्‍थिती, 'अल्‍पभेटी'वर निराश झालेल्‍या चाहत्‍यांचा धिंगाणा

पुढारी वृत्तसेवा

Messi in india :

कोलकाता: महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्‍या बहुचर्चित कोलकाता भेटीला आज गोलबोट लागले. मेस्सी स्टेडियममध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळ उपस्थित होता. यामुळे त्‍याची एक झलक पाहण्‍यासाठी तासन्तास वाट पाहणाऱ्या अनेक चाहत्यांची निराशा झाली. यावेळी त्‍यांनी अधिकारी आणि राजकारण्यांना लक्ष्य करून घोषणाबाजी करत मैदानावर बाटल्‍या फेकल्‍या. अचानक घडलेल्‍या प्रकाराने मैदानावर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. या कार्यक्रमाचे नियोजन नियोजन अत्यंत खराब होते, असा आरोप या चाहत्यांनी केला आहे.

मेस्‍सीचे अभूतपूर्व उत्‍साहात स्‍वागत

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोलकात्याच्या आयकॉनिक सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. फुटबॉलप्रेमींनी अभूतपूर्व उत्‍साहात मेस्‍सीचे स्‍वागत केले. लिओनेल मेस्सीने खचाखच भरलेल्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये प्रवेश करता चाहत्‍यांनी एकच जल्‍लोष केला. त्‍याच्‍या जयघोषाने स्टेडियम दणाणून गेले. उभे राहून चाहत्‍यांनी झेंडे फडकावले आणि एकसुरात त्याचे नाव घेत घोषणा दिल्या. स्‍टेडियमवरील वातावरणा एक चैतन्‍य निर्माण झाले.

शाहरुख खान आपला धाकटा मुलगा अबराम खान याच्यासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला आणि दोघांनीही मेस्सीसोबत छायाचित्रे काढण्यासाठी अशी पोझ दिली.

शाहरुख खान आणि अबरामने घेतली लिओनेल मेस्सीची भेट

फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सीने 'गोट इंडिया टूर २०२५' च्या भागांतर्गत शनिवारी कोलकात्यातील लेक टाऊन येथील श्री भूमी स्पोर्टिंग क्लबमध्ये आपल्या ७० फुटी पुतळ्याचे आभासी अनावरण केले. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि उरुग्वेचा फुटबॉलपटू लुईस सुआरेझ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, ज्यामुळे परिसरामध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. फुटबॉल आणि बॉलवूडमधील दोन आयकॉन एकत्र आल्याने चाहत्‍यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुख खान आपला धाकटा मुलगा अबराम खान याच्यासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला आणि दोघांनीही मेस्सीसोबत छायाचित्रे काढण्यासाठी पोझ दिली.

मेस्‍सीने दहा मिनिटात स्‍टेडियम सोडले..

मेस्सीला इतर VVIP सोबत मैदानाबाहेर काढण्यापूर्वी तो स्टेडियममध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळ उपस्थित होता. अर्जेंटिनाचा आयकॉन पाहण्याच्या आशेने तासन्तास वाट पाहणाऱ्या अनेक चाहत्यांना त्याची व्यवस्थित झलक न मिळाल्याने निराशा झाले. काही चाहत्यांनी पोस्टरचे फलक फाडले, बाटल्या फेकल्या. यामुळे स्‍टेडियमवर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. सुरक्षा व्यवस्था वाढ करण्‍यात आली. स्‍टेडियमवरील परिस्‍थिती सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात झालेल्या गोंधळाचे चित्र स्पष्ट झाले. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ऐतिहासिक आणि आनंदी असा हा क्षण गालबोट लागून संपुष्टात आला.

पैसे, भावना आणि वेळ वाया गेला..!

कार्यक्रमासाठी आलेल्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) चाहत्यांनी आयोजकांवर आपला तीव्र रोष व्यक्त केला. एका चाहत्‍याने एएनआयशी बोलताना सांगितले की, या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत वाईट होते. मेस्सी फक्त १० मिनिटांसाठी आला. सर्व नेते आणि मंत्री त्याच्याभोवती गर्दी करून उभे होते. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने एकही किक मारली नाही किंवा एकही पेनल्टी घेतली नाही. तो फक्त १० मिनिटे आला आणि निघून गेला. किती पैसे, भावना आणि वेळ वाया गेला! आम्हाला काहीच पाहता आले नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT