Tokyo World Athletics | मेलिसाला महिलांच्या 100 मीटरचे विजेतेपद Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Tokyo World Athletics | मेलिसाला महिलांच्या 100 मीटरचे विजेतेपद

10.61 सेकंदांचा नवीन स्पर्धा विक्रम

पुढारी वृत्तसेवा

टोकियो; वृत्तसंस्था : टोकियो 2025 च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अमेरिकेची जागतिक क्रमवारीत अग्रगण्य असलेली मेलिसा जेफरसन-वुडन हिने महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.61 सेकंदांची नवीन स्पर्धा विक्रम वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले.

या शर्यतीत जमैकाची टिया क्लेटनने 10.76 सेकंदांच्या सर्वोत्तम वेळेसह रौप्यपदक पटकावले, तर विद्यमान ऑलिम्पिक विजेती जुलियन अल्फ्रेडला 10.84 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जेफरसन-वुडनने 2025 मध्ये 10.65 सेकंदांची सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवली होती. तो विक्रम तिने या स्पर्धेत मागे टाकला. मागील विश्वविजेती शा’कॅरी रिचर्डसन 10.94 सेकंदांच्या वेळेसह पाचव्या स्थानावर राहिली. शेली फ्रेझर-प्राईस तिच्या कारकिर्दीतील अखेरच्या मोठ्या स्पर्धेत 11.03 सेकंदांच्या वेळेसह सहाव्या स्थानावर राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT