पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या ( Indian Men's Football Team ) मुख्य प्रशिक्षकपदी स्पेनचे माजी फुटबॉलपटू मानोलो मार्केझ ( Manolo Marquez ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा आज ( दि. २०)अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) कार्यकारी समितीने केली. 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय संघाचा नामुष्कीजनक पराभवानंतर स्टिमॅकयांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
५५ वर्षीय मानोलो मार्केझ हे सध्या इंडियन सुपर लीग संघ एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. 'एआयएफएफ'ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, " फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीने दिवसाच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत चर्चा केली. एकमताने मनोलो मार्केझ यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ( Indian Men's Football Team )
२०२४-२५ च्या हंगामात मानोलो मार्केझ हे एफसी गोवाचे येथे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही आपली भूमिका सुरुच ठेवतील. पूर्णवेळ आधारावर राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी ते हाताळतील. दरम्यान, मानोलो मार्केझ यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ किती दिवसांचा असेल हे एआयएफएफने स्पष्ट केलेले नाही.