महेंद्रसिंग धोनी यांनी सांगितले आपल्या जर्शीवरच्या '७' नंबरचे गुपित www.pudharinews. 
स्पोर्ट्स

महेंद्रसिंग धोनीने सांगितले आपल्या जर्शीवरच्या ‘७’ नंबरचे गुपित

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या संपुर्ण करियरमध्ये जर्शीवर ७ नंबर का आहे? याबाबत खुलासा केला आहे.  धोनीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. धोनीने ७ नंबर लकी असल्याने ही जर्शी घालत असल्याचे धोनीचे चाहते मानतात. खुद्द धोनीने इंडीया सिमेंटच्या एका कार्यक्रमात याबाबत खुलासा केला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये धोनीला त्याच्या जर्शीवरील ७ नंबर बाबत विचारण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीने  याबाबत सांगितले की, हा नंबर माझा जन्म ७ जुलैला झाल्याने निवडला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसल्याचे तो म्हणाला आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी यंदाच्या आयपीएलच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

मी सुरूवातीला ७ नंबर जन्मतारखेमुळेच निवडला होता, पण नंतर लोकांनी अनेक गोष्टी यासोबत जोडायला सुरूवात केली. खर सांगायचे तर मी असा विचार करत नाही, असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला आहे. तरीही त्याने शेवटी ७ नंबर माझ्यासाठी जवळचा आहे, यामुळेच हा नंबर संपुर्ण करियरमध्ये माझ्या जर्शीवर असल्याचे सांगितले आहे. चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल २०२२ चा पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स विरूद्ध खेळणार आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT