वाघोली : गादी व माती विभागातील लढतीत टिपलेले चुरशीचे क्षण.  
स्पोर्ट्स

Maharashtra Kesari Wrestling Tournament | सिकंदर, पृथ्वीराज, शिवराज, हर्षवर्धन उपांत्यपूर्व फेरीत

68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचे आव्हान संपुष्टात

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे : 68 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतविजेत्या सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांनी स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत मजल मारली आहे.

वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेच्या गादी विभागाच्या दुसर्‍या फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने धाराशिवच्या धीरज बारस्कर याचा 12 - 2 असा पराभव केला. नांदेडच्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या श्रेयस होळकर याचा 10 - 0 असा एकतर्फी पराभव केला.

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने सांगलीच्या सत्पाल शिंदे याचा 10-0 असा पराभव केला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने अमरावतीच्या वेताळ शेळके याचा 8-1 असा पराभव केला. सोलापूर शहराच्या जय पाटीलने चेतन रेपाळे (अहिल्यानगर) याच्याविरुद्ध प्रेक्षणीय लढतीत 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. लातूर जिल्ह्याच्या अक्षय मंगवडने कोल्हापूर जिल्ह्याच्या सुशांत तांबूळकवर 3-1 अशी मात केली. पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने धाराशिवच्या धीरज बारस्करला 12-2 अशा गुणांनी नमवले. अकोल्याच्या सिद्धांत गवईने गडचिरोलीच्या संग्राम पाटीलला 13-3 अशा फरकाने पराभूत केले, तर सातार्‍याच्या दिग्विजय जाधवने हिंगोलीच्या गजानन भोयरवर 10-0 असा दणदणीत विजय मिळवला.

माती विभागाच्या दुसर्‍या फेरीत हिंगोलीच्या सिकंदर शेख याने पुण्याच्या मनीष रायते 8-2 याचा असा प्रभाव केला. गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले याने नाशिकच्या बाळू बोडखे याचा 4-1 असा पराभव केला. सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने धाराशिवच्या शिवराज लोकरेचा 10-0 अशा फरकाने पराभव केला. रत्नागिरीच्या संतोष दोरवडविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्याच्या शुभम शिदनाळने 5-0 असा विजय मिळवला. पुणे जिल्ह्याच्या सागर देवकातेला सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने 10-0 अशा फरकाने पराभूत केले. नंदूरबारच्या शशिकांत जमाळेला अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने 6-0 अशा फरकाने पराभूत केले.

गादी विभागात सोलापूर, ठाण्याचे मल्ल अंतिम फेरीत

सकाळच्या सत्रात गादी विभागातील 86 किलो वजनी गटात सोलापूरच्या विकास कार्ये याने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणवर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसर्‍या उपांत्य लढतीत ठाण्याच्या सूरज माने याने सोलापूरच्या गोपीनाथ सुतारचा 8-4 अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT