ड्रेस काेड कारवाईचा निषेध करत फेडरेशन इंटरनॅशलन डे चेस (फिडे)च्‍या कोणत्‍याही स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होणार नाही, असे कार्लसनने जाहीर केले आहे.  (Image source- X)
स्पोर्ट्स

'जीन्‍स' चालणार नाही..! जगज्जेता बुद्धिबळपटू कार्लसन जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी अपात्र

'ड्रेस कोड' प्रकरणी २०० डॉलरचा दंडही, 'फिडे'च्‍या सर्वच स्‍पर्धांवर कार्लसनचा बहिष्‍कार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात बुद्धिबळपटू, पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) याला FIDE च्या ड्रेस कोडचे उल्लंघन प्रकरणी जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्‍यात आले आहे. स्‍पर्धेवेळी जीन्स परिधान केल्याबद्दल त्‍याला २०० डॉलरचा दंडही ठोठावण्‍यात आला आहे. दरम्‍यान, या कारवाईचा निषेध करत यापुढे फेडरेशन इंटरनॅशलन डे चेस (फिडे)च्‍या कोणत्‍याही स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होणार नाही, असे कार्लसनने जाहीर केले आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स घालण्यास मनाई

जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स घालण्यास मनाई आहे. स्‍पर्धेतील तिसरी फेरी सुरु असताना कार्लसन याला ड्रेस कोडच्‍या पालन करण्‍याची विनंती करण्‍यात आली. मात्र त्‍याने आठव्‍या फेरी अखेरही आपली भूमिका कायम ठेवत आपण तत्‍काळ ड्रोस बदलणार नाही उद्‍या ड्रेस कोडचे पालन करु, असे त्‍याने सांगितले. यानंतर नवव्‍या फेरीसाठी आयाेजकांनी कार्लसनला पेरिंगमधून वगळले. यामुळे ताे अपात्र ठरला. या कारवाईचा निषेध करत यापुढे फेडरेशन इंटरनॅशलन डे चेस (फिडे)च्‍या कोणत्‍याही स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होणार नाही, असे कार्लसनने जाहीर केले.

काय म्‍हणाले 'फिडे'? 

फेडरेशन इंटरनॅशलन डे चेस (फिडे)ने सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म Xवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ड्रेस कोडचे नियम खेळाडूंना स्पष्टपणे समजावून सांगण्यात आले होते. पेशाखाचे नियम FIDE ऍथलीट्स कमिशनच्या सदस्यांनी तयार केले आहेत. यामध्‍ये व्यावसायिक खेळाडू आणि तज्ञ आहेत. हे नियम वर्षानुवर्षे लागू आहेत. याची सर्व स्‍पर्धक खेळाडूंना माहीत आहेत. तसेच प्रत्येक स्पर्धेपूर्वी त्यांना याची माहिती दिली जाते. मॅगनस कार्लसनने जीन्स घालून ड्रेस कोडचे उल्लंघन केले. त्याला पोशाख बदलण्याची विनंती करण्यात आली मात्र त्‍याने ती मान्‍य केली नाही. त्‍यामुळे त्याला अपात्र ठरवावे लागले. जीन्स घालण्यास मनाई असल्याचे दीर्घकाळ चाललेल्या नियमांमध्ये स्पष्ट आहे. ड्रेस कोड उल्‍लंघन प्रकरणी कार्लसनला २०० डॉलरचा दंडही ठोठावण्‍यात आला आहे."

अतिशय हास्यास्पद नियम, यापुढे 'फिडे'च्‍या कोणत्‍याही स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होणार नाही 

माध्‍यमाशी बोलताना कार्लसन म्‍हणाला की, FIDE च्या ड्रेस कोड धोरणाला कंटाळल्यामुळे ब्लिट्झ क्लासमध्ये सहभागी होणार नाही. मी FIDE ला कंटाळलो आहे आणि आता हे नियम स्‍वीकारु शकत नाही. मला सर्वांची माफी मागायची आहे. हा अतिशय हास्यास्पद नियम आहे. मी उद्या माझा पेहराव बदलू शकलो असतो; पण ते ऐकायला तयार नाहीत. यापुढे फेडरेशन इंटरनॅशलन डे चेस (फिडे)च्‍या कोणत्‍याही स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होणार नाही.

मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा ग्रॅंडमास्टर असून, तो जगात पहिल्या क्रमांकाचा अव्‍वल मानांकित बु्द्धिबळपटू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाला होता. तब्‍बल पाचवेळा पाच वेळा जगज्जेता होण्‍याचा विक्रमही त्‍याच्‍या नावावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT