दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. Pudhari.
स्पोर्ट्स

Lungi Ngidi Injured | लुंगी एनगिडी गंभीर जखमी, क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत; स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर

Lungi Ngidi Injured |किंग्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानावर धाव घेत केली प्रकृतीची विचारपूस

पुढारी वृत्तसेवा

Lungi Ngidi Injured

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. मैदानावर फिजियोनी येऊन त्याची विचारपूस केली, त्यानंतर स्ट्रेचरवरून त्‍याला मैदानाबाहेर नेण्‍यात आले. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. सुरुवातीला तो डॉक्टरांशी बोलत होता. यावेळी पंजाब किंग्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानावर धाव घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.

डोक्याला दुखापत

दिल्ली आणि पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

मैदानात नेमकं काय घडलं ?

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा एनगिडीने तिसऱ्या षटकात 'मिड-ऑफ'वरून धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाज प्रियांश आर्याच्या शॉटवर त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही आणि संतुलन बिघडल्यामुळे तो जोरात खाली पडला. खाली पडताना त्याच्या डोक्याचा मागचा भाग जमिनीवर जोरात आदळला.

फिजियो तातडीने मैदानात

घटनेनंतर लगेचच मैदानावरील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मदतीसाठी धावले. कुलदीप यादव आणि डेव्हिड मिलर यांच्यासह अनेक खेळाडू चिंतेत दिसले. संघाच्या फिजियोनी तातडीने मैदानात येत एनगिडीवर प्राथमिक उपचार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT