स्पोर्ट्स

LSG vs RCB : लखनौचे पारडे जड

Arun Patil

कोलकाता ; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस् आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (LSG vs RCB) यांच्यातील महत्त्वपूर्ण सामना बुधवारी येथील प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. या संघात जो विजय मिळवेल त्याला अंतिम फेरीत प्रवेश करणे सुकर होईल. एकूण अंदाज घेतला जर लखनौचे पारडे बेंगलोरपेक्षा जड दिसत आहे.

लखनौचे पारडे या लढतीत जड दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत 14 सामने खेळून 9 जिंकले आहेत तर त्यांना 5 सामन्यांत हार स्वीकारावी लागली आहे. कर्णधार लोकेश राहुल याचा भन्नाट फॉर्म ही लखनौसाठी जमेची बाजू ठरली आहे. शिवाय गोलंदाजीतही त्यांच्याकडे उत्तमोत्तम खेळाडू आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांत लखनौने सुरेख प्रदर्शन केले आहे. (LSG vs RCB)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले असून त्यांच्या खात्यात 16 गुण जमा झाले आहेत. फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या या चमूने 8 विजय आणि 6 पराभव अशी कामगिरी बजावली आहे. लखनौविरुद्ध त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या लढतीत बेंगलोरने लखनौवर शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे या लढतीत हा संघ आत्मविश्वासने मैदानात प्रवेश करेल. एकूणच बुधवारचा सामना अतिशय चुरशीने खेळला जाईल, असे संकेत मिळत आहेत.

मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट दिसून येत आहे. अर्थात, जरी पावसाचे आगमन झाले तरी त्यासाठी आयोजकांनी खास नियम तयार केले असून त्याद्वारे विजयी संघ निश्चित केला जाणार आहे.

संघ यातून निवडणार (LSG vs RCB)

लखनऊ सुपरजायंट्स – केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, के गॉथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बडोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.

SCROLL FOR NEXT