नवी दिल्ली : जगभरातील आघाडीच्या फुटबॉलपटूंपैकी एक असणारा अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी डाव्या पायाने किक मारतो आणि त्याचा डावा पाय किती अनमोल आहे, हे त्याने घेतलेल्या विम्यावरूनच अधोरेखित होते. आपल्या डाव्या पायाच्या बळावरच मेस्सीने फुटबॉल जगतात एकापेक्षा एक विश्वविक्रम गाजवत अब्जावधी रुपये कमावले आहेत आणि याचमुळे कदाचित त्याने आपल्या डाव्या पायाचा थोडाथोडका नव्हे तर चक्क 8 हजार कोटींचा विमा उतरवला आहे. कोणीही एका व्यक्तीने शरीराच्या कोणत्याही एकाच अंगासाठी घेतलेला हा सर्वात मोठा विमा आहे. मेस्सीच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गजांनी असा विक्रमी विमा उतरवलेला आहे.
व्हीनस विल्यम्स
टेनिसपटू, अमेरिका
दोन्ही हातांची मनगटे
157 कोटी
फुटबॉलपटू/ वेल्स
दोन्ही पाय
1048 कोटी
फुटबॉलपटू / पोर्तुगाल
दोन्ही पाय
1289 कोटी
फुटबॉलपटू, इंग्लंड
दोन्ही पाय व चेहरा
1746 कोटी
फुटबॉलपटू, अर्जेंटिना
डावा पाय
8 हजार कोटी
आपल्या शरीराच्या कोणत्याही एकाच भागाचा मोठा विमा उतरवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या या यादीत भारताच्या केवळ दोनच खेळाडूंचा समावेश आहे. ते म्हणजे माजी टेनिसपटू सानिया मिर्झा व ऑलिम्पिक पदक जेता विजेंदर सिंह. अर्थात, या उभयतांनी किती रकमेचा विमा उतरवला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
टेनिस / दोन्ही हात
मुष्टियोद्धा, दोन्ही हातांची बोटे
हा विमा ज्या भागासाठी उतरवला जातो, त्याच्यावरील इलाजासाठी अजिबात असत नाही. हा विमा उतरवण्याचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे दुखापतीमुळे कमाईत होणारे नुकसानीची पूर्ण भरपाई मिळवणे. आता एखाद्या खेळाडूने पायाचा विमा उतरवला असेल तर दुखापत मैदानावर होऊदे किंवा मैदानाबाहेर, त्याला पूर्ण भरपाई दिली जाते.
मेस्सीचा 8 हजार कोटींचा विमा असला तरी त्याला आपल्या विमा करारातील काटेकोर अटींंचे कटाक्षाने पालन करावे लागते. याचे कारण म्हणजे बहुतांशी विम्याचे करार महागडे असल्याने त्याच्या अटी-शर्ती देखील काटेकोर असतात. उदाहरणार्थ, मेस्सीचा विमा फक्त अधिकृत सामन्यांपुरताच मर्यादित असतो. यामुळे, कोणताही अनधिकृत, प्रदर्शनीय सामना खेळताना त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली तर त्याला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही. याचमुळे, त्याने भारतात कोणताही प्रदर्शनीय सामना खेळता आला नाही आणि याच कारणामुळे भारतातील चाहत्यांना प्रदर्शनीय सामना न खेळता मेस्सीने मैदानात येऊन मारलेली एकमेव किक पाहून त्यावर समाधान मानावे लागले!