RCB Home Ground IPL 2026 pudhari
स्पोर्ट्स

RCB Home Ground IPL 2026: आरसीबी हक्काच्या होम ग्राऊंडवरच खेळणार... कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, KSCA ला मिळाली परवानगी

Anirudha Sankpal

RCB Home Ground IPL 2026: रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे यंदाच्या आयपीएल २०२६ मधील सामने कुठे होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कर्नाटक सरकारनं चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी घातली होती. आयपीएल विजयी रॅलीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर हा निर्णय घेतला होता.

मात्र आता कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या विशेष समितीने कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला आरसीबीचे २०२६ च्या आयपीएल हंगामाचे सामने होस्ट करण्याची परवानगी दिली आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमला परवानगी?

अखेर आरसीबीचं हक्काचं होम ग्राऊंड त्यांना परत मिळालं आहे. बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर २८ मार्च रोजी पहिल्यांदा चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्यांदाच सामना होणार आहे. आरसीबी आणि सनराईजर्स हैदराबद यांच्यात आयपीएलचा ओपनिंग सामना होणार आहे. हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याचबरोबर चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे प्ले ऑफ आणि फायनल देखील खेळवण्यात येणार आहे. मात्र हे सामने खेळवण्याबाबत शेवटचा निर्णय हा १६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी सरकारची समिती स्टेडियमची पाहणी करणार आहे.

होम ग्राऊंडवर ५ सामने

दरम्यान, आरसीबीने ते आपले ५ होम ग्राऊंडवरील सामने हे चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. ते आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, 'विधान सौधमध्ये राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विशेष समिती आणि केएससीएचे प्रतिनिधी, आरसीबी आणि डीएनएचे देखील प्रतिनिधी उपस्थित होते.

सांगण्यास आनंद होत आहे की या बैठकीत विशेष समितीने चिन्नास्वामी स्टेडियम कशाप्रकारे तयारी करत आहे आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करत आहे याचा अहवाल सादर केला. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी आणि तयारीची आढावा घेतल्यानंतर आदरणीय गृहमंत्र्यांनी आगामी आयपीएल सामन्याचे आयोजन चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्याची परवानगी दिली आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT