स्पोर्ट्स

Kho-Kho Tournament : महाराष्ट्राच्या मुलींचा सिक्कीमवर सहज विजय

Arun Patil

बन्सबेरिया (पश्चिम बंगाल), वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सोमवारपासून सुरू झालेल्या 41 व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत (Kho-Kho Tournament) महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सिक्कीमचा सहज पराभव करत साखळी सामन्यातील पहिला विजय मिळवला.

बन्सबेरीया येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरू आहेत. सकाळच्या सत्रात झालेल्या साखळी सामन्यात महाराष्ट्र मुलींच्या संघाने सिक्कीमचा 1 डाव 18 गुणांनी (23-5) असा धुव्वा उडवला. या सामन्यात दीपाली राठोड (4 मि. संरक्षण व 3 गुण), संपदा मोरे (3.30 मि.संरक्षण व 2 गुण), काजल शेख (3 मि. संरक्षण व 3 गुण), प्रणाली काळे (2.30 मि. संरक्षण), कल्याणी कंक (1.30 मिनीट संरक्षण व 4 गुण), सोनाली पवार (2 मिनिटे संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत सिक्कीम संघातर्फे मारिया, मोरेशी यांनी चांगला खेळ केला.

उर्वरित मुलींच्या सामन्यात कर्नाटकने विदर्भचा (18-11) असा 7 गुणांनी पराभव केला. तसेच आसामने दादरा नगर हवेलीचा (29-2) असा एक डाव 27 गुणांनी, मणिपूरने जम्मू काश्मीरचा (17-6) असा एक डाव 11 गुणांनी, पुद्दुचेरीने चंदीगडचा (13-2) असा एक डाव 11 गुणांनी पराभव केला. (Kho-Kho Tournament)

कुमार गटात आसामने बिहारचा (22-8) असा 1 डाव 14 गुणांनी, केरळने दादरा नगर हवेलीचा (23-6) असा एक डाव 17 गुणांनी, चंदीगडने त्रिपुराचा (14-13) एक गुण 6.20 मिनिटे राखून विजय मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT