गुवाहाटी :
सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमधील कुमारांच्या 55 किलो गटात सुवर्णपदक मिळविताना स्नॅचमध्ये 107 किलो वजन उचलले. त्याने प्रशांत कोळी या आपल्या सहकार्यानेच नोंदविलेला 104 किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला. संकेतने एकूण 239 किलो वजन उचलत ओडिशाच्या मुना नायक याचा 235 किलोचा विक्रमही मोडला. मुन्ना नायक (235 किलो) याला येथे रौप्यपदक मिळाले तर महाराष्ट्राच्या प्रशांत कोळी याने कांस्य (231 किलो) मिळविले.
स्वप्न साकार झाले : संकेत
सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते. ते साकार झाले. सुवर्णपदकामुळे मिळणार्या शिष्यवृत्तीमुळे वेटलिफ्टिंगसाठीच्या खचार्ची तरतूद करणे शक्य होणार आहे,' असेही संकेतने सांगितले. तो आष्टा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शिकत आहे.