IPL in Australia Pudhari
स्पोर्ट्स

IPL Matches: IPL पुन्हा देशाबाहेर जाणार; कोणत्या देशात होणार सामने? काय आहे प्लॅन?

IPL Set to Go Global Again: IPL सामने आता ऑस्ट्रेलियात खेळवण्याची चर्चा जोरात सुरू आहे. Adelaide Oval येथे IPL सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

पुढारी वृत्तसेवा

IPL in Australia: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ही आता फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या लीगला पुन्हा एकदा भारताबाहेर नेण्याची तयारी सुरू झाली आहे. आणि यावेळी IPL थेट ऑस्ट्रेलियात खेळवण्याचा प्लॅन समोर आला आहे.

ऑस्ट्रेलियात IPL सामना? मोठी चर्चा सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ॲडलेड ओव्हल मैदानावर पुढील वर्षी मार्च महिन्यात IPL चा एक नियमित सामना आयोजित करण्याची योजना आखली जात आहे. जर हा प्लॅन यशस्वी झाला, तर IPL प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळवली जाईल. क्रिकेटप्रेमींसाठी हा मोठा आणि ऐतिहासिक क्षण ठरू शकतो.

या कल्पनेमागे कोण?

या प्रस्तावामागे ॲडलेड ओव्हलचे चेअरमन जेमी ब्रिग्स आणि साउथ ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनचे (SACA) प्रमुख विल रेयनर यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी यासाठी विविध संबंधित पक्षांशी चर्चा देखील केली आहे. मात्र अजूनपर्यंत BCCI कडून अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.

BBL सोबत एक्सचेंज प्लॅन?

या प्लॅनमधील सर्वात रंजक भाग म्हणजे ऑस्ट्रेलियाची Big Bash League (BBL) देखील भारतात, विशेषतः चेन्नईमध्ये एक सामना आयोजित करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच, दोन्ही देशांमध्ये क्रिकेट एक्सचेंजचे एक नवीन मॉडेल तयार होऊ शकते.

ॲडलेड का निवडलं?

मार्च महिना ऑस्ट्रेलियात क्रिकेटसाठी उत्तम मानला जातो. हवामान अनुकूल असतं, स्थानिक सामने नसतात आणि प्रेक्षकांचा प्रतिसादही जबरदस्त असतो. याशिवाय, ॲडलेडमुळे पर्यटनाला चालना मिळते.

BCCI च्या निर्णयाची प्रतीक्षा

सध्या हा प्रस्ताव उत्साह वाढवणारा असला तरी अंतिम निर्णय Board of Control for Cricket in India कडे आहे. BCCI कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच हा प्लॅन प्रत्यक्षात येऊ शकतो.

IPL आता जागतिक स्तरावर आणखी विस्तार करण्याच्या तयारीत आहे. जर ऑस्ट्रेलियात सामना झाला, तर ही लीग खऱ्या अर्थाने “ग्लोबल क्रिकेट लीग” बनेल. आता सगळ्यांचं लक्ष
BCCI काय निर्णय घेणार, याकडे लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT