IPL 2026 Playoff Scenario PUDHARI
स्पोर्ट्स

IPL 2026 Playoff Scenario: आता चुकला की Playoff ला मुकला... जाणून घ्या सर्व सघांची स्थिती अन् नॉक आऊटची संधी

Anirudha Sankpal

IPL 2026 Playoff Scenario: बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर पराभूत संघ पंजाब किंग्ज हा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

या सामन्यानंतर आयपीएल २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट आला आहे. हैदराबादच्या विजयानंतर अनेक संघांसाठी आता करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आता आयपीएलचे प्ले ऑफचे चित्र कसे असेल अन् उर्वरित सामन्यात प्रत्येत संघाला कशी संधी आहे.

आयपीएलची गुणतालिका

  1. सनराईजर्स हैदराबाद - ११ सामने - १४ गुण

  2. पंजाब किंग्ज - १० सामने - १३ गुण

  3. रॉयल चॅलेंजर बंगळुरू - ९ सामने - १२ गुण

  4. राजस्थान रॉयल्स - १० सामने - १२ गुण

  5. गुजरात टायटन्स - १० सामने - १२ गुण

  6. चेन्नई सुपर किंग्ज - १० सामने - १० गुण

  7. दिल्ली कॅपिटल्स - १० सामने - ८ गुण

  8. कोलकाता नाईट रायडर्स - ९ सामने - ७ गुण

  9. मुंबई इंडियन्स - १० सामने - ६ गुण

  10. लखनौ सुपर जायंट्स - ९ सामने - ४ गुण

१. सनरायझर्स हैदराबाद (SRH)

सद्यस्थिती: हैदराबादला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित ३ सामन्यांपैकी फक्त १ विजय आवश्यक आहे.

फायदा: त्यांचा नेट रन रेट (+०.७३७) अतिशय चांगला असून ते टॉप-२ मध्ये राहण्याचे प्रबळ दावेदार आहेत.

पुढील सामने: वि. गुजरात (१२ मे), वि. चेन्नई (१८ मे), वि. बंगळुरू (२२ मे).

२. पंजाब किंग्स (PBKS)

सद्यस्थिती: उर्वरित ४ सामन्यांपैकी किमान २ विजय मिळवल्यास संघ १७ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.

स्थिती: चांगल्या नेट रन रेटमुळे (+०.५७१) एका विजयानंतरही त्यांना संधी मिळू शकते, परंतु सलग तीन पराभवांमुळे त्यांचे टेन्शन वाढले आहे.

पुढील सामने: वि. दिल्ली (११ मे), वि. मुंबई (१४ मे), वि. बंगळुरू (१७ मे), वि. लखनऊ (२३ मे).

३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

सद्यस्थिती: प्लेऑफसाठी उर्वरित ५ सामन्यांपैकी २ ते ३ विजय आवश्यक आहेत.

फायदा: आरसीबीचा नेट रन रेट (+१.४२०) स्पर्धेत सर्वोत्तम आहे, त्यामुळे १४ गुणांवरही ते पात्र ठरू शकतात.

पुढील सामने: वि. लखनऊ (७ मे), वि. मुंबई (१० मे), वि. कोलकाता (१३ मे), वि. पंजाब (१७ मे), वि. हैदराबाद (२२ मे).

४. राजस्थान रॉयल्स (RR)

सद्यस्थिती: सुरक्षित राहण्यासाठी उर्वरित ४ पैकी २ विजय मिळवून १६ गुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

स्थिती: त्यांचा नेट रन रेट (+०.५१०) समाधानकारक आहे, मात्र कामगिरीतील चढ-उतार त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहेत.

पुढील सामने: वि. गुजरात (९ मे), वि. दिल्ली (१७ मे), वि. लखनऊ (१९ मे), वि. मुंबई (२४ मे).

५. गुजरात टायटन्स (GT)

सद्यस्थिती: संघ सध्या टॉप-४ मध्ये असला तरी त्यांचा नेट रन रेट (-०.१४७) उणे आहे.

गरज: उर्वरित ४ पैकी किमान २ मोठे विजय मिळवणे त्यांना अनिवार्य आहे.

पुढील सामने: वि. राजस्थान (९ मे), वि. हैदराबाद (१२ मे), वि. कोलकाता (१६ मे), वि. चेन्नई (२१ मे).

६. चेन्नई सुपर किंग्स (CSK)

सद्यस्थिती: प्लेऑफसाठी उर्वरित ४ सामन्यांपैकी किमान ३ विजय आवश्यक आहेत.

स्थिती: त्यांचा नेट रन रेट (+०.१५१) सध्या पॉझिटिव्ह आहे, जो समान गुणांच्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल.

पुढील सामने: वि. लखनऊ (१० मे), वि. लखनऊ (१५ मे), वि. हैदराबाद (१८ मे), वि. गुजरात (२१ मे).

७. दिल्ली कॅपिटल्स (DC)

सद्यस्थिती: दिल्लीसाठी आता 'करा किंवा मरा' अशी स्थिती असून त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील.

अडचण: खराब नेट रन रेट (-०.९४९) मुळे त्यांना फक्त विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

पुढील सामने: वि. कोलकाता (८ मे), वि. पंजाब (११ मे), वि. राजस्थान (१७ मे), वि. कोलकाता (२४ मे).

८. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

सद्यस्थिती: शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित ५ पैकी ५ सामने जिंकून १७ गुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

अडचण: खराब नेट रन रेट (-०.५३९) मुळे त्यांना केवळ ४ विजय मिळवून १४ किंवा १५ गुणांवर पात्र होणे कठीण आहे.

पुढील सामने: वि. दिल्ली (८ मे), वि. बंगळुरू (१३ मे), वि. गुजरात (१६ मे), वि. मुंबई (२० मे), वि. दिल्ली (२४ मे).

९. मुंबई इंडियन्स (MI)

सद्यस्थिती: मुंबई जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे त्यांना सर्व सामने जिंकून इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

अडचण: उणे नेट रन रेट (-०.६४९) ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडथळा आहे.

पुढील सामने: वि. बंगळुरू (१० मे), वि. पंजाब (१४ मे), वि. कोलकाता (२० मे), वि. राजस्थान (२४ मे).

१०. लखनऊ सुपर जाएंट्स (LSG)

सद्यस्थिती: लखनऊच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

स्थिती: सर्व ५ सामने जिंकूनही ते केवळ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांचा नेट रन रेट (-१.०७६) स्पर्धेत सर्वात खराब आहे.

पुढील सामने: वि. बंगळुरू (७ मे), वि. चेन्नई (१० मे), वि. चेन्नई (१५ मे), वि. राजस्थान (१९ मे), वि. पंजाब (२३ मे).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT