Shreyas Iyer Fine Pudhari
स्पोर्ट्स

Shreyas Iyer Fine: दुहेरी शिक्षा... दोन सामन्यात 36 लाखांच नुकसान; श्रेयस अय्यरचं कुठे गंडतय?

Shreyas Iyer Fine: श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर रेटमुळे सलग दुसऱ्या सामन्यात दंड भरावा लागणार आहे. त्याच्यावर 24 लाखांचा दंड असून दोन सामन्यात एकूण 36 लाखांचा फटका बसला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shreyas Iyer Fine: IPL मध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्सला सलग दोनदा विजय मिळाला असला, तरी कर्णधार श्रेयस अय्यरला मोठा आर्थिक फटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्यावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दोन सामने, दोनदा नियमभंग

पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला हरवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात Chennai Super Kings ला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. CSK ने दिलेल्या 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबने 19व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. मात्र, या विजयासोबतच संघ पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटच्या जाळ्यात अडकला.

अय्यरवर दुप्पट दंड

Board of Control for Cricket in India (BCCI) च्या नियमांनुसार, सलग दुसऱ्या वेळेस स्लो ओव्हर रेटचा भंग केल्यामुळे अय्यरवर 24 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला. यापूर्वी गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर 12 लाखांचा दंड लावण्यात आला होता. त्यामुळे केवळ दोन सामन्यांतच अय्यरला एकूण 36 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

प्लेयर ऑफ द मॅचलाही दंड

या प्रकरणात फक्त कर्णधारच नाही, तर संपूर्ण संघालाही दंड सहन करावा लागला. ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरलेला प्रियांश आर्य याच्यासह प्लेइंग-11 मधील सर्व खेळाडूंवर 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% (जे कमी असेल ते) इतका दंड लावण्यात आला.

नियम काय सांगतात?

IPL च्या कोड ऑफ कंडक्टनुसार:

  • पहिल्या उल्लंघनात फक्त कर्णधारावर दंड

  • दुसऱ्या उल्लंघनात संपूर्ण संघावर कारवाई

  • कर्णधारावर दुप्पट दंड

यामुळे पंजाब किंग्सला विजय मिळूनही आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

पंजाब किंग्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत सलग दोन विजय मिळवले, पण नियमभंगामुळे त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. क्रिकेटमध्ये फक्त विजयच नाही तर शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT