IPL 2026 MS Dhoni file photo
स्पोर्ट्स

IPL 2026 MS Dhoni: एमएस धोनी सर्व सामने खेळणार का? चेन्नई सुपर किंग्सकडून मोठी अपडेट!

IPL 2026: IPL 2026 मध्ये एमएस धोनी सर्व सामने खेळणार का? चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मोहन कारंडे

IPL 2026 MS Dhoni

नवी दिल्ली: आयपीएल २०२६ चा बिगुल वाजण्यास आता काहीच अवधी उरला असून, क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा एकाच नावाची चर्चा रंगली आहे ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी. चेन्नई सुपर किंग्सचा हा दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामात सर्व सामने खेळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धोनी यंदा मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले असले तरी, तो सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून समजते.

सीएसकेमधील एका वरिष्ठ सूत्राने 'पीटीआय'शी बोलताना धोनीच्या उपलब्धतेबद्दल सांगितले. "धोनी चेन्नईत दाखल होत असून त्याने या हंगामासाठी आपली उपलब्धता स्पष्ट केली आहे. मात्र, तो सर्व सामने खेळणार की नाही, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे," असे या सूत्राने सांगितले. या वर्षाच्या अखेरीस धोनी ४५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष दिले जात आहे.

संजू सॅमसनच्या आगमनाने कामाचा ताण होणार कमी

संघात संजू सॅमसनच्या आगमनामुळे सीएसकेकडे आता यष्टीरक्षणाचे (Wicketkeeping) एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे धोनीवरील कामाचा ताण कमी होऊ शकतो. ज्या सामन्यांमध्ये धोनी खेळणार नाही, तिथे सॅमसन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. याशिवाय संघात उर्वील पटेल आणि युवा खेळाडू कार्तिक शर्मा यांसारखे इतर यष्टीरक्षकही आहेत.

फिटनेसचे आव्हान आणि 'चेपॉक'चे प्रेम

गेल्या काही वर्षांत धोनीला गुडघा आणि पाठदुखीच्या समस्यांनी ग्रासले आहे. आयपीएलचे व्यस्त वेळापत्रक आणि यष्टीरक्षणासाठी लागणारी शारीरिक क्षमता पाहता, संघ व्यवस्थापन त्याला जपून वापरण्याची शक्यता आहे. 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे धोनी केवळ फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतो.

असे असले तरी, चेन्नईच्या 'चेपॉक' स्टेडियमवर होणाऱ्या घरच्या सामन्यांमध्ये धोनी खेळताना दिसेल, अशी दाट शक्यता आहे. चेन्नईच्या प्रेक्षकांचे धोनीवर असलेले प्रेम जगजाहीर असून, त्याला पाहण्यासाठी मैदानावर होणारी गर्दी आणि उत्साह आजही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT