स्पोर्ट्स

IPL 2025 RCB Performance : आरसीबीची सुवर्ण विक्रमाकडे वाटचाल! IPLच्या इतिहासात ‘असे’ आजपर्यंत कोणत्याच संघाला जमलेले नाही

IPLच्या चालू हंगामात RCB शानदार कामगिरी केरत आहे. संघाने आतापर्यंत एकूण 7 सामने जिंकले आहेत.

रणजित गायकवाड

ipl 2025 rcb performance virat kohli team Will set a new record in ipl history

बेंगळुरू : आयपीएल 2025 मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ खूप चांगली कामगिरी करत आहे. संघात विराट कोहलीसारखा सुपरस्टार फलंदाज आणि भुवनेश्वर कुमारसारखा अनुभवी गोलंदाज आहे. प्रत्येक विभागात आरसीबी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दिसून आले आहे. हा संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये त्यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित आहे.

आरसीबीने घरच्या मैदानाबाहेर 6 सामने जिंकले

आयपीएलच्या एका हंगामात लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानाबाहेर 7 सामने खेळतो. आयपीएलमध्ये बहुतांश संघ आपल्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करतात, परंतु घराबाहेरच्या सामन्यांमध्ये त्याचे रेकॉर्ड खराब असते. पण यंदाच्या हंगामात आरसीबीची कहाणी बदललेली दिसत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने आतापर्यंत घरच्या मैदानाबाहेर 6 सामने खेळले असून हे सर्व सामने जिंकले आहेत. त्यांचा घराबाहेर अजून एक सामना बाकी आहे, जो त्यांना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 9 मे रोजी खेळायचा आहे. हा सामना एलएसजीचे होम ग्राउंड एकाना स्टेडियममध्ये रंगणार आहे.

इतिहास रचण्याची संधी

आरसीबीला एकाना स्टेडियमवर विजयाचा झेंडा फडकवून नवा विक्रम रचण्याची संधी आहे. आरसीबीने एलएसजीविरुद्धचा सामना जिंकला तर आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात लीग स्टेजमध्ये घरच्या मैदानाबाहेर सर्व सामने जिंकणारा हा पहिला संघ ठरेल. आतापर्यंत कोणत्याही संघाला आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये एका हंगामात घराबाहेर सर्व सामने जिंकता आलेले नाहीत. आरसीबीकडे हा मोठा विक्रम नोंदवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आयपीएल 2012 मध्ये घरच्या मैदानाबाहेर एकूण 10 सामने खेळले होते (यामध्ये दोन प्लेऑफ सामनेही समाविष्ट होते), ज्यापैकी लीग स्टेजमधील एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा केकेआर संघ जयपूर येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभूत झाला होता.

पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबी अव्वल स्थानावर

यंदाच्या हंगामात आरसीबीने आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि 3 सामने गमावले आहेत. 14 गुणांसह त्यांचा नेट रन रेट +0.521 आहे. सध्या ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. यंदाच्या हंगामाच्या प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे.

विराट कोहलीची सातत्यपूर्ण कामगिरी :

विराट कोहलीने 6 सामन्यांमध्ये 30+ धावा केल्या आणि या सर्व सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवला. त्याच्या अनुभव आणि फलंदाजीने संघाला मजबूत पाया दिला.

मजबूत फलंदाजी रचना :

देवदत्त पडिक्कल आणि कोहली यांच्या अर्धशतकांसारख्या योगदानामुळे आरसीबीने मोठे धावसंख्येचे लक्ष्य उभारले, जसे की राजस्थान रॉयल्सविरुद्ध 205 धावा. नवीन खेळाडूंनीही प्रभावी कामगिरी केली.

प्रभावी गोलंदाजी :

जोश हेजलवुडने 4 विकेट घेऊन निर्णायक क्षणी सामन्याचा रुख पलटवला, तर क्रुणाल पांड्याने 8 विकेट घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही योगदान दिले.

क्रुणाल पांड्याचा अष्टपैलू खेळ :

क्रुणाल पांड्याला लवकर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय आणि त्याच्या गोलंदाजीतील योगदानाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गेम-चेंजर ठरले.

ऐतिहासिक विजय :

आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सलग 6 होम ग्राउंडबाहेरील सामने जिंकले, ज्याने संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

सामूहिक योगदान :

प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिले, ज्यामुळे संघाची ताकद वाढली. मेगा लिलावात जोश हेजलवुड, लियाम लिव्हिंगस्टोन आणि फिल सॉल्ट यांसारख्या खेळाडूंमुळे संघ संतुलित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT