ipl 2025 mumbai indians not defeat playoff teams punjab kings rcb and gt
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (एमआय)साठी आतापर्यंतचा हंगाम खूप चढ-उताराचा राहिला आहे. पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सुरुवातीला एकामागून एक पराभवांना सामोरे जावे लागत आहे आणि नुकताच पंजाब किंग्ज (पीबीकेएस)ने एमआयला झटका देत शेवटच्या साखळी सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. या पराभवामुळे मुंबईच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. या हंगामात त्यांना अद्याप प्लेऑफ पात्रता फेरीतील कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
मुंबई इंडियन्सला या हंगामात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दोनदा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध एकदा आणि आता पंजाब किंग्ज विरुद्ध एकदा पराभव पत्करावा लागला आहे. जीटी, आरसीबी आणि पीबीकेएस या तिन्ही संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या यादीत मुंबईने स्थान पक्के केले आहे. मात्र पंजाबकडून पराभव पत्करल्यानंतर ते फक्त क्वालिफायर-2 खेळतील.
मुंबईच्या खेळात सातत्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी आयपीएलची शर्यत अधिक कठीण होत आहे. आता, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, मुंबई इंडियन्सना केवळ दोन सामने खेळावे लागणार नाहीत तर सातत्य राखून दोन्ही सामने जिंकावे लागतील. अन्यथा, त्यांच्यासाठी आयपीएलचा हा हंगाम संपुष्टात येईल.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही कोसळली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईची सुरुवात संथ झाली आणि सूर्या वगळता टॉप-ऑर्डरमधीक फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत. अखेर सूर्याच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी 184 धावांपर्यंत मजल मारली. स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबई संघात ना फलंदाज धावा काढू शकले आणि ना गोलंदाज पंजाबच्या फलंदाजांना रोखू शकले. प्रत्युत्तरात पंजाबने 9 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.