आरसीबी यंदाच्या मेगा लिलावापूर्वी आपल्या संघात अनेक मोठे बदल करू शकतो.  File Photo
स्पोर्ट्स

RCBमध्ये होणार मोठा बदल! फ्रँचायझी डुप्लेसिस-मॅक्सवेलचा पत्ता कट करणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मेगा लिलावाबाबत यंदा सर्व संघ वेगवेगळे डावपेच आखत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) देखील या हंगामाच्या मेगा लिलावासाठी सज्ज आहे आणि अनेक स्टार खेळाडूंसह आपला संघ मजबूत करू इच्छितो.

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 वर्षांच्या इतिहासात एकही विजेतेपद मिळवू न शकलेला विराट कोहलीचा संघ आरसीबी यंदाच्या मेगा लिलावापूर्वी आपल्या संघात अनेक मोठे बदल करू शकतो. यादरम्यान फ्रँचायझीकडून कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. यात संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, यष्टीरक्षक फलंदाज रजत पाटीदार यांना संघातून वगळण्यात येईल असे सूत्रांकडून समजते आहे.

Glenn Maxwell पत्ता कट होणार

स्टार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे. सध्या तो आरसीबीचा भाग आहे. तथापि, आयपीएलमधील लिलावात मॅक्सवेल नेहमीच चढ्या किमतीत विकला जातो, परंतु प्रत्यक्षात याची कामगिरी चमकदार नसते. अशा परिस्थितीत यंदाच्या मेगा लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ त्याला रिटेने करण्याची योजना आहे. पण असे झाल्यास मुंबई इंडियन्स किंवा पंजाब किंग्ज हे संघ त्याला आपल्या संघात समाविष्ट करू शकतात, अशीही चर्चा आहे.

आरसीबीचे कर्णधार पद केएल राहुलकडे?

यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. राहुल सध्या लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. मात्र, गेल्या हंगामात एलएसजीचे मालक ज्या पद्धतीने राहुलशी वागले ते पाहता तो संघाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. त्याचा कल पुन्हा आरसीबीकडे जाण्याचा आहे. त्याला तिथे कर्णधार बनवले जाऊ शकते अशा बातम्या येत आहेत. दरम्यान, फ्रँचायझीकडून विराट कोहली, मोहम्मद सिराज, विल जॅक, कॅमेरून ग्रीन आणि रीस टोपली यांना कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT