ipl 2025 kkr vs csk match varun chakravarthy fined by bcci
कोलकाता : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या CSKने बुधवारी (दि. 8) ईडन गार्डन्सवर यजमान संघावर दोन विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवाने अजिंक्य रहाणेच्या KKR संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या.
आयपीएलने या घटनेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, पण सांगितले की हा स्तर 1 चा अपराध आहे, जो कलम 2.5 अंतर्गत येतो. हे कलम त्या वेळी लागू होते जेव्हा एखादा क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करणारा खेळाडू बाद झालेल्या फलंदाजाकडे पाहुन अशी भाषा, हालचाल किंवा इशारा करतो, ज्यामुळे त्या फलंदाजाची प्रतिक्रिया आक्रमक होऊ शकते. डेवाल्ड ब्रेविसला बाद केल्यानंतर वरुणने CSKच्या फलंदाजाला मैदान सोडण्याचा इशारा केला होता.
हे कलम त्या वेळी लागू होते जेव्हा एखादा क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करणारा खेळाडू बाद झालेल्या फलंदाजाकडे पाहुन अशी भाषा, हालचाल किंवा इशारा करतो, ज्यामुळे त्या फलंदाजाची प्रतिक्रिया आक्रमक होऊ शकते. डेवाल्ड ब्रेविसला बाद केल्यानंतर वरुणने CSKच्या फलंदाजाला मैदान सोडण्याचा इशारा केला होता.
ब्रेविसने 25 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या होत्या आणि त्याची विकेट घेतल्यामुळे केकेआरने सामन्यात पुनरागम केले. वरुणने 4 षटकांत फक्त 18 धावा देत 2 बळी घेतले, तरीही केकेआर 179 धावांचा बचाव करू शकला नाही.
केकेआर आता गुणतालिकेत 12 सामन्यांत 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा फारशा उरलेल्या नाहीत. त्यांचे उरलेले दोन्ही लीग सामने घराबाहेर आहेत, ज्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर सीएसकेने हे लक्ष्य 19.4 षटकांत 8 गडी गमावून पूर्ण केलं. सीएसकेकडून या सामन्यात नूर अहमदने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक 4 बळी घेतले आणि यामुळे त्याला सामनावीर (प्लेयर ऑफ द मॅच) घोषित करण्यात आलं.