स्पोर्ट्स

IPL 2022 Auction : झोपेतून उठताच यश दयालला बसला सुखद धक्‍का

Arun Patil

बंगळूर : उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याला गुजरात टायटन्स (IPL 2022 Auction) संघाने मूळ किमतीच्या 16 पट किंमत देऊन खरेदी केले; पण त्याचे नशीब फळफळले तेव्हा यश चक्‍क झोपला होता. झोपेतून जागा झाल्यावर त्याला ही गोड बातमी समजली.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाने (IPL 2022 Auction) अनेक नव्या खेळाडूंना क्षणार्धात करोडपती बनवले. यशला गुजरात टायटन्सने 3.20 कोटी रुपयांना संघात दाखल केले. तो सध्या रणजी ट्रॉफीसाठी गुरुग्राममध्ये आहे. जिथे त्याला त्याच्या टीम उत्तर प्रदेशसह एका हॉटेलमध्ये क्‍वारंटाईन करण्यात आले आहे.

यश हॉटेलच्या खोलीत आयपीएलचा लिलाव पाहत होता; पण त्याचे नाव येत नव्हते, म्हणून तो टी.व्ही. बंद करून आणि मोबाईल फोनही सायलेंट करून झोपला; पण तासाभरानंतर जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा त्याच्या फोनवर मित्र आणि कुटुंबीयांचे मिस्ड कॉल्स आणि मेसेज आले होते.

वडील चंद्रपाल दयाल यांचे 20 मिस्ड कॉल यशच्या फोनवर होते. त्याने आधी त्याच्या वडिलांना फोन केला, नंतर कळले की, त्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे आणि गुजरात टायटन्स संघाने त्याला मूळ किमतीच्या 16 पट देऊन 3.2 कोटी रुपयांना खरेदी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT