दुबई : पुढारी ऑनलाईन
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२० मध्ये फलंदाजीत अधिक जादू करू शकलेला नाही. पण असे असले तरी आपल्या यष्टिरक्षणातून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सध्या धोनीने आपल्या लुकमध्ये बदल केला आहे. आरसीबी विरुध्द होणाऱ्या सामन्या अगोदरचे त्याचे नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याने आपल्या नव्या लुकमध्ये डोक्यावरील केस कमी केले आहेत.
कुल धोनीने शेव्ह करत आपली दाढीही कमी केली आहे. अभिनेता आमिर खानच्या 'गजनी' चित्रपटातील लुकप्रमाणे हा लुक आहे. तर दुसरीकडे चाहत्यांनाही २०११ च्या विश्वचषक विजेत्यावेळच्या लुकची आठवण येत आहे.
सोशल मीडियावर धोनीच्या या नव्या लुकची चर्चा होत असली तरी उष्णतेमुळे माहीने हा लुक केला आहे. यावर्षी सीएसकेची कामगिरी काही खास राहिली नाही. चेन्नईचे सलामीवीर फॉर्मात आली असली तरी इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली नाही.
वाचा : KXIPvsKKR : राहुल – मयांकच्या शतकी सलामीनंतरही पंजाबची हाराकिरी