पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रविवारी (दि.१९) हिमानी या मुलीशी लग्नगाठ बांधली. त्याने स्वत : सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. (Neeraj Chopra married )
त्याने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येकांचा मी आभारी आहे. शेवटी त्याने आपले व हिमानीचे नाव लिहिले आणि मध्यभागी एक हृदयाचा इमोजी देखील दिला आहे. गुपचूप लग्न उरकताना त्याचे काही नातेवाईक या लग्नसमारंभाला उपस्थित होते. (Neeraj Chopra married )
हिमानी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असून ती न्यू हैम्पशायरमधील फ़्रैंकलिन पियर्स विद्यापीठात 'स्पोर्ट्स मॅनेजमेंट' शिकत आहे. तिने याआधी दिल्लीतील मिरांडा हाऊस येथे राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयात पदवी घेतली होती.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले. सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड खेळाडू आहे. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ८९.४५ मीटर अंतर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले. नीरज दुसऱ्या स्थानावर होता. दरम्यान, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. (Neeraj Chopra married )