Indian football Controversies pudhari
स्पोर्ट्स

Indian football Controversies: भारतीय फुटबॉल रसातळाला... पैसे थकवले म्हणून मैदानावरच प्रवेश नाकारला

Anirudha Sankpal

Indian football Controversies: भारतीय फुटबॉल दिवसेंदिवस रसातळाला जाताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय फुटबॉल कोणत्या ना कोणत्या वादात अडकत आहे. गेल्या वर्षी इंडियन सुपर लीग दरम्यान, झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता राष्ट्रीय संघासोबत अजून एक मोठी घटना घडली आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा AFC Asian Cup चा क्वलिफायर सामना हाँग काँग विरूद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाचे कोच खालीद जमील आणि काही खेळाडूंना कोची येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रवेश नाकारण्यात आला. याचं कारण पैसे देण्यावरून वाद असल्याचं सांगण्यात आलं. यामुळं आता भारतीय फुटबॉल फेडरेशनचे प्रशासन आणि समन्वयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नेमकं काय घडलं?

संघ ठरलेल्या पत्रकार परिषदेसाठी कोची येथील स्टेडियमवर आली. ही पत्रकार परिषद हाँग काँगविरूद्धच्या सामन्यापूर्वी होत होती. जवळपास एका दशकानंतर कोचीमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा सामना होणार आहे. मात्र जसे संघाचे प्रशिक्षक आणि काही खेळाडू स्टेडियममध्ये प्रवेश करू लागले तसे सर्वांना धक्काच बसला.

कोच जमील हे कुरीयन, सहाल अब्दुल समाद आणि बिजॉय वर्गीस यांना सुरक्षा रक्षकांनी मैदानात प्रवेश करण्यापासून रोखलं. हे सुरक्षा रक्षक ग्रेटर कोची डेव्हलपमेंट अथोरिटीचे होते. एवढंच काय तर पत्रकारांना देखील प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळं या ठिकाणी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

ही घटना पैसे न भरल्यामुळं घडल्याचं समोर आलं. त्यानंतर केरळ फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नवास मीरन यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही छोटी तांत्रिक समस्या आहे असं सांगितलं. त्यांनी ३१ मार्च रोजी हाँग काँगविरूद्ध होणारा सामना ठरल्या प्रमाणे होईल असं आश्वस्त देखील केलं.

मीरन म्हणाले की आशिया कप पात्रता सामना ठरल्या प्रमाणे होईल. गुरूवारी काही तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. ती लवकरच सोडवण्यात येईल.

GCDA ची काय माहिती

मिळालेल्या माहितीनुसार GCDA ने स्टेडियमसाठी अतिरिक्त ३ लाख रूपये भाडं २० - २५ लाख रूपये सिक्युरिटी डिपॉझिटची मागणी केली होती. GCDA अधिकाऱ्यांनी पूर्ण पेमेंट झाल्याशिवाय मैदानात प्रवेश करून दिला जाणार नाही असं सांगितलं. दरम्यान, केरळ फुटबॉल असोसिएशनने या पेमेंटसाठी आणखी वेळ मागितला होता.

याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात इंडियन सुपर लीग क्लब केरळ ब्लास्टर संघाला देखील पेमेंट वादावरून प्रवेश नाकारण्यात आला होता. हे मैदान GCDA च्या मालकीचे आहे. मात्र इथं केरळ फुटबॉल असोसिएशनच्या मार्फत सामने आयोजित केले जातात. आता या दोन घटनांवरून असं स्पष्ट झालं आहे की या दोन फुटबॉल संघटनांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT