operation sindoor indian army attack pakistan rawalpindi stadium destroyed
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव तिव्र झाला आहे. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, परंतु भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच पाकिस्तानी क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडले. आता भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी स्टेडियमवर हल्ला करून ते स्टेडियम उद्ध्वस्त केले आहे.
पाकिस्तान सुपर लीग 2025 सध्या पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात होती, जिथे 8 मे रोजी रावळपिंडीच्या मैदानावर पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात सामना होणार होता. पण आता भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि स्टेडियम उद्ध्वस्त केले आहे. या कारणास्तव, गुरुवारी (दि. 8) रात्री येथे होणारा सामना रद्द करण्यात आला आहे.
रावळपिंडीचे मैदानान उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाच्चकी झाली आहे. येथे होणारे पीएसएलचे सामने सामने त्यांना आता कराचीमध्ये शिफ्ट करावे लागणार आहेत. याशिवाय, पाकिस्तान सोडून दुस-या देशात पीसीबी सामने आयोजित केले जाण्याची ते योजना आखत असल्याचे समोर आले आहे.
7 आणि 8 मे च्या रात्री, पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. मात्र भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत हे हल्ले हाणून पाडले. याअंतर्गत भारताने रावळपिंडीसह पाकिस्तानच्या अनेक मोठ्या शहरांवर हल्ला केला आणि त्यांची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली.